कॉमेडियन राजू श्रीवास्तव यांच्यावर अजूनही उपचार सुरू आहेत. अशातच त्यांच्या प्रकृतीबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. राजू श्रीवास्तव यांना ताप येत आहे, त्यामुळे त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं आहे. डॉक्टर त्यांच्या प्रकृतीवर लक्ष ठेवून आहेत, असं त्यांच्या भावाने सांगितलं. तसेच जोपर्यंत राजू श्रीवास्तव यांच्या मेंदूची हालचाल होत नाही, मेंदू पूर्णपणे सक्रिय होत नाही, तोपर्यंत त्यांच्या परिस्थितीत फारशी सुधारणा झाली आहे, असं म्हणता येणार नसल्याचं डॉक्टरांचं म्हणणं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

तुरुंगातून जामिनावर सुटलेल्या केआरकेचा इशारा; ट्वीट करून म्हणाला, “मी बदला…”

राजू श्रीवास्तव यांना रुग्णालयात दाखल करून ३१ दिवस झाले आहेत. परंतु ते अजूनही व्हेंटिलेटरवर आहेत. देशभरातील त्यांचे चाहते त्यांची प्रकृती सुधारावी यासाठी प्रार्थना करत आहेत. राजू श्रीवास्तव यांना रुग्णालयात दाखल केल्यानंतर १५ दिवसांनी शुद्ध आली होती. दिल्ली एम्समधील डॉक्टरांचे उपचार आणि चाहत्यांच्या प्रार्थनेमुळे राजू श्रीवास्तव यांना १५ दिवस आयसीयूमध्ये ठेवल्यानंतर ते शुद्धीवर आले होते, असं राजू श्रीवास्तव यांच्या पर्सनल सेक्रेटरी यांनी काही दिवसांपूर्वी सांगितलं होतं.

‘भाभी जी…’ फेम अभिनेत्री ठरली ऑनलाइन फसवणुकीची बळी; घडलेला प्रकार शेअर करत म्हणाली, “मला तो कॉल…”

राजू श्रीवास्तव हे १० ऑगस्टला व्यायामशाळेत ट्रेडमिलवर धावत असताना त्यांना हृदयविकाराचा झटका आला होता. त्यांच्या छातीत दुखू लागल्यानंतर ते अचानक खाली पडले. यानंतर त्यांना प्रशिक्षकाने तातडीने रुग्णालयात दाखल केले होते. राजू श्रीवास्तव यांची अँजिओग्राफी करण्यात आली आहे. यानंतर राजू श्रीवास्तव यांची प्रकृती खालावली होती आणि तेव्हापासून त्यांच्यावर विविध प्रकारच्या पद्धतीने उपचार करण्यात येत आहेत.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Raju srivastava on ventilator support due to fever health update hrc