प्रसिद्ध विनोदी कलाकार राजू श्रीवास्तव यांचं आज २१ सप्टेंबर रोजी उपचारादरम्यान निधन झालं. राजू यांना १० ऑगस्ट रोजी जिममध्ये व्यायाम करत असताना हृदयविकाराचा झटका आला होता. त्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. तब्बल ४० दिवस त्यांच्यावर तज्ज्ञ डॉक्टरांनी उपचार केले, परंतु डॉक्टरांचे सर्व प्रयत्न आणि राजू यांची मृत्यूशी झुंज अपयशी ठरली. आज त्यांचं निधन झालं आहे, अशी माहिती डॉक्टरांनी दिली.
राजू यांच्या निधनानंतर त्यांच्या अनेक कॉमेडी क्लिप्स व्हायरल होत आहेत. सध्या त्यांची अशीच एक कॉमेडी क्लिप व्हायरल होत आहे, ज्यामध्ये त्यांनी शशी कपूर यांची मिमिक्री केली होती. शशी कपूर आणि विनोद खन्ना करोना आजाराविरोधात जागरूकता कशी पसरवतील, याबद्दल त्यांनी व्हिडीओत मिमिक्री केली होती.
राजू श्रीवास्तव यांनी सहा आठवड्यांपूर्वी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर मिमिक्रीचा हा व्हिडीओ शेअर केला होता. त्यांच्या या व्हिडीओवर जाऊन चाहते प्रतिक्रिया देत आहेत. तसेच हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात शेअर केला जात आहे.
…अन् भर कॉन्सर्टमध्ये चाहतीने दिग्गज गायकाला केलं Kiss; व्हिडिओ तुफान व्हायरल
हृदयविकाराच्या झटक्याने राजू श्रीवास्तव यांच्या मेंदूचे प्रचंड नुकसान झाले होते. त्यांची प्रकृती चिंताजनक होती, त्यामुळे त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. डॉ. नितीश न्याय यांच्या नेतृत्वाखालील एम्सच्या कार्डिओलॉजी आणि आपत्कालीन विभागातील डॉक्टरांच्या टीमद्वारे त्यांच्यावर उपचार केले जात होते. पण सर्व उपचार करूनही राजू यांच्या प्रकृतीत फारशी सुधारणा झाली नाही आणि आज २१ सप्टेंबर रोजी त्यांची प्राणज्योत मालवली.