अभिनेते-कॉमेडियन राजू श्रीवास्तव गेल्या दीड महिन्यांपासून आयुष्याशी झुंज देत होते. पण आज बुधवारी (२१ सप्टेंबर २०२२) त्यांचं निधन झालं. ४० दिवसांपूर्वी दिल्लीतील जिममध्ये व्यायाम करत असताना त्यांना हृदयविकाराचा झटका आला होता आणि त्यांना एम्समध्ये दाखल करण्यात आलं होतं. तेव्हापासून त्यांच्यावर तज्ज्ञ डॉक्टर उपचार करत होते, परंतु उपचारादरम्यानच राजू श्रीवास्तव यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांची अँजिओप्लास्टी झाली होती व गेल्या ४० दिवसांपासून ते व्हेंटिलेटरवर होते.

शुद्धीवर आल्यानंतर पत्नीशी फक्त चारच शब्द बोलू शकले होते राजू श्रीवास्तव; तेच ठरले अखेरचे

राजू श्रीवास्तव यांच्या निधनावर चित्रपटसृष्टीतून हळहळ व्यक्त केली जात आहे. राजू यांच्या निधनाने त्यांच्या कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्यांच्या पत्नीची रडून रडून वाईट अवस्था झाली आहे. टाईम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार, राजू यांची पत्नी शिखा श्रीवास्तव म्हणाली, “मी सध्या बोलू शकत नाही. मी आता काय बोलू किंवा काय शेअर करू? त्याने खूप संघर्ष केला, मला खरोखर आशा होती की तो रुग्णालयातून बरा होऊन घरी परतेल. त्यासाठी मी प्रार्थनाही करत होते, पण तसं झालं नाही. मी एवढेच म्हणेन की ते खरा लढवय्या होता.”

Photos: राजू श्रीवास्तव यांच्या लेकीने वाचवला होता आईचा जीव; जाणून घ्या शौर्य पुरस्कार विजेत्या अंतरा श्रीवास्तवबद्दल

राजू श्रीवास्तव यांचा पुतण्या कुशल श्रीवास्तव आणि कौटुंबिक मित्र डॉ. अनिल मुरारका हे गेल्या दोन महिन्यांपासून त्यांना नियमितपणे एम्समध्ये भेटायला येत होते. कुशल म्हणाला, “दुसऱ्यांदा हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांचे निधन झाले. आम्हाला कालपर्यंत वाटत होतं की सर्व काही ठीक होईल, पण तसं झालं नाही,” असं कुशलने सांगितलं.

Story img Loader