आपल्या हटके शैलीत प्रेक्षकांच्या चेहऱ्यावर हसू आणणारे प्रसिद्ध कॉमेडियन राजू श्रीवास्तव यांचा आज जन्मदिवस. २१ सप्टेंबर रोजी त्यांचं निधन झालं. त्यांच्या निधनानंतर सहा त्यांचा पहिलाच जन्मदिन. त्यानिमित्त त्यांची पत्नी शिखा श्रीवास्तव एक मुलाखत दिली. मुलाखतीत त्यांनी बऱ्याच गोष्टींचा उलगडा केला.

राजू श्रीवास्तव यांच्या जन्मदिनानिमित्त त्यांच्या पत्नीने आज तक या वृत्तवाहिनीला मुलाखत दिली. या मुलाखतीत त्यांना, “राजू श्रीवास्तव यांची अशी कोणती अपुरी इच्छा आहे जी तुम्हाला पूर्ण करायची आहे?” असा प्रश्न विचारण्यात आहे. या प्रश्नाचं उत्तर देताना राजकारणाचं नाव घेत या क्षेत्रात काम करण्याची इच्छा व्यक्त केली.

आणखी वाचा : राजकारणी, पंतप्रधान, कवी… पाहा ‘मैं अटल हूँ’ या चित्रपटातील पंकज त्रिपाठींची पहिली झलक

त्या म्हणाल्या, “तू एक कलाकार होते आणि त्यांचा वारसा आमची दोन्ही मुलं पुढे चालवत आहेत. ची मुलगी अंतरा एका प्रोडक्शन हाऊस मध्ये काम करते, तर आमचा मुलगा आयुष्मानला सितार वाजवण्यामध्ये रस आहे. राजू आपल्या दोन्ही मुलांना यशस्वी झालेलं पाहू इच्छित होते. या व्यतिरिक्त त्यांना राजकारणात खूप रस होतं. त्यांना राजकारणातही बरंच काम करायचं होतं.

हेही वाचा : “त्याने अनेक वर्षे अनेकांना हसवले पण…”, राजू श्रीवास्तव यांच्या शोकसभेत जॉनी लीव्हर झाले भावुक

पुढे त्या म्हणाल्या, “राजू यांनी त्यांच्या शेवटच्या काळात राजकारणात सक्रिय सहभाग घेतला. ते भाजपा पक्षात सामील झाले. मोदी यांच्या स्वच्छ भारत अभियानाचे ते ब्रँड अँबेसिडर झाले. चित्रपट विकास मंडळाचेही अध्यक्ष झाले. या क्षेत्रातही त्यांना बरंच काम करायचं होतं पण त्यांच्या निधनाने त्यांचे हे स्वप्न अपूर्ण राहिलं. त्यामुळे मला जर संधी मिळाली तर मला त्यांचं हे स्वप्न पूर्ण करायला आवडेल. पण ते कसं पूर्ण होईल याबाबत मला आत्ता कल्पना नाही.”