एकांकिका स्पर्धांच्या परंपरागत साचेबद्धपणापेक्षा वेगळेपण असलेल्या आणि नाट्य, चित्र, शिल्प, संगीत, नृत्य या कलांचा संगम साधून मराठी भाषेच्या दैदिप्यमान परंपरेला आजच्या युवापिढीच्या माध्यमातून उजाळा देण्याचा प्रयत्न राज्य मराठी विकास संस्थेने केला आहे. राज्यस्तरीय आंतरमहाविद्यालयीन नाट्याविष्कार स्पर्धा ‘रंगवैखरी’चा नाट्य जल्लोष राज्यभर सुरू असून येत्या रविवारी ६ जानेवारीला मुंबईत प्रभादेवीच्या रवींद्र नाट्य मंदिर येथे होणाऱ्या महाअंतिम फेरीने या नाट्यजल्लोषाचा परमोच्च बिंदू गाठला जाणार आहे. सकाळी १० वाजल्यापासून सुरु होणारा हा राज्यभरातल्या निवडक नाट्याविष्कारांचा नाट्यजल्लोष प्रेक्षकांसाठी विनामुल्य आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

बदलत्या काळात आपल्या मनातील विचार, कल्पना लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी लेखकांना, कवींना साहित्याच्या-भाषेच्या मांडणीत बदल करणे अनिवार्य वाटू लागते. हे सर्जक बदल केवळ परंपरेला विरोध म्हणून येत नाहीत तर आपल्या साहित्यातून आशय-अभिव्यक्तीच्या नव्या सर्जक वाटा शोधण्याची ऊर्मी त्यात असते. मराठी साहित्यातही हे वेळोवेळी दिसून आलेले आहे. नव्या वाटा शोधणारे, काही बंडखोर कवी, लेखक पुढील काळात मराठी साहित्यातील मानदंड म्हणून नावाजले गेले, नवोदितांना दिशादर्शक ठरले. मराठी साहित्यात मानदंड म्हणून नावाजले गेलेले निवडक सतरा कवी आणि कादंबरीकार राज्य मराठी विकास संस्थेने निवडले. त्यांपैकी कोणत्याही एका कवीच्या किंवा कादंबरीकाराच्या साहित्यावर आधारित नाट्याविष्काराच्या सादरीकरणासाठी ‘नव्या वाटा’ हा विषय देण्यात आला.

कवी – ज्ञानेश्वर , तुकाराम, मोरोपंत, केशवसुत, बा. सी. मर्ढेकर, नामदेव ढसाळ, आरती प्रभू, अरुण कोलटकर, कादंबरीकार – ह. ना. आपटे,र. वा. दिघे,श्री. ना. पेंडसे,अण्णाभाऊ साठे,व्यंकटेश माडगूळकर,भाऊ पाध्ये,कमल देसाई, भालचंद्र नेमाडे, श्याम मनोहर यांपैकी कोणत्याही एका कवीच्या कवितांवर किंवा कादंबरीकाराच्या कादंबरीवर आधारित नवीन नाट्यसंहिता विद्यार्थ्यांनी लिहून–दिग्दर्शित करून, तिचे संगीत, नृत्य, चित्र, शिल्प यांसह ४० मिनिटांचे नाट्याविष्काराचे सादरीकरण विद्यार्थ्यांनी करायचे होते. विशेष म्हणजे विद्यार्थ्यांनी हे अशक्यप्राय आव्हान पेलले असून राज्यभरातले आठ तुल्यबळ संघ अंतिममध्ये दाखल झाले आहेत.
मराठीच्या समृद्ध अशा भाषिक साहित्यिक व सांस्कृतिक परंपरेचा मागोवा घेण्याच्या उद्देशाने प्रेरित ही स्पर्धा प्रेक्षकांना अविस्मरणीय अनुभव देईल हे निश्चित.