वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत राहणारी राखी सावंत गेल्या काही दिवसांपासून या ना त्या कारणामुळे चर्चेत येत आहे. नुकतच राखीने हरियाणातील झालेल्या रेसलिंग स्पर्धेत हजेरी लावली होती. मात्र या खेळात राखीला दुखापत झाली असून तिला थेट रुग्णालय गाठावं लागल्याचं समोर आलं आहे.

हरियाणातील पंचकुला येथे कॉन्टिनेंटल रेसलिंग इंटरनॅशनल (सीडब्ल्यूई) बॅनरखाली रेसलिंगच्या बिग फाईटचं आयोजन करण्यात आलं होतं. या स्पर्धेत राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय महिला कुस्तीपटूंनी सहभाग घेतला होता. या स्पर्धेत राखीने विजयी महिला कुस्तीपटूला आव्हान करत तिच्याशी दोन हात करण्याचा प्रयत्न केला.मात्र राखीला हे आव्हान चांगलंच महागात पडलं असून विदेशी महिला कुस्तीपटूने राखीला धोबीपछाड केलं आहे.

आयोजित केलेल्या स्पर्धेत विदेशी कुस्तीपटू रैवलने फाईट जिंकल्यानंतर ‘कुण्या भारतीय महिलेत हिंमत असेल तर तिने माझ्याशी लढावे’, असं ओपन चॅलेंज दिले. तिचं हे चॅलेंज ऐकताच राखीने तिला प्रतिआव्हान देत ‘तुझ्यात दम असेल तर तू माझ्यासारखं नाचून दाखव’ असं सांगितलं. त्यानंतर राखीने डान्स करण्यास सुरुवात केली. मात्र तिचा डान्स पाहत असताना अनेकांनी राखीला चीअरअप करत रैवलनला ठेंगा दाखवत चिडवले. हा राग मनात धरत रैवलनने राखीला हवेत उचलून जोरात जमिनीवर आपटलं.

दरम्यान, जमिनीवर जोरात आपटल्यामुळे राखीच्या पाठीत आणि पोटात असह्य वेदना होऊ लागल्या त्यामुळे तिला रुग्णालयात दाखल करावं लागल्याचं सांगण्यात येत आहे. ‘राखीने कुस्तीपटू रैवलला डान्ससाठी आव्हान दिले. त्यानंतर प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया पाहून रैवलला अचानक राग अनावर झाला आणि तिने राखीला उचलून खाली आपटले. मात्र आता राखीची प्रकृती ठीक असल्याचं’, आयोजक समितीचे सदस्य बलवान यांनी सांगितले

Story img Loader