सनी लिओनी भलेही जगभरात प्रसिद्ध असेल आणि हल्ली आपल्या सिनेमांमुळे तिच्या नावाची चर्चा बॉलिवूडमध्येही असते. पण आयटम क्वीन राखी सावंतच्या समोर तिची पात्रता ही कोणत्याही सहाय्यकापेक्षा कमी नाही. म्हणून जेव्हा राखीने सनी- लिओनीला आपले सेक्रेटरी करायचे ठरवले तेव्हा सनीही त्या प्रस्तावाला नाकारु शकली नाही.
झालं असं की, राखी एक नवीन वेब सीरीजचा शो करत आहे. ‘राखी की खाकी’ या नावाने ही वेब सीरीज असेल. यात ती एका पोलिस ऑफिसरची भूमिका साकारताना दिसणार आहे. यात चालू घडामोडींवर या सीरीजच्या भागात भाष्य होताना दिसणार आहे. ही वेब सीरीज फक्त पौढांसाठीच आहे. यात राखीने सनी आणि लिओनी या दोन व्यक्तिरेखांना आपले सहकारी म्हणून ठेवले आहे. भलेही वास्तवात राखीला सनी फारशी आवडत नसली तरी या सीरीजमध्ये ती या दोन व्यक्तिरेखेंवर दमदाटी करताना दिसत आहे.
राखी तिच्या या नवीन वेब शोबद्दल सांगते की, मी यात सनीला माझी सेक्रेटरी बनवले आहे. याच बरोबर तिने यातली सनी ही पोर्न स्टार आहे असेही सांगितले आहे. पण आमच्या सनीला आम्ही साडी नेसवली आहे. मी सनीला सेक्रेटरी बनवले. तेही पडद्यावर तर यात हरकत काय आहे?
सनीबद्दल राखी म्हणाली की तिला तर हिंदीही येत नाही. ती तर इथे येऊन शिकली आहे. तरीही आपण तिचे कौतुक करतो. राखीने या वेब सीरीजच्या माध्यमातून दहशतवादावरही भाष्य केले आहे. तिने या वेब सीरीजच्या पहिल्या भागात नवाज शरीफ यांच्या एक व्यक्तिरेखेलाही खूप काही सुनावले.
याच बरोबर ती म्हणाली की, मी आता उत्तर प्रदेश इथे निवडणूकीला उभी राहणार आहे. पण मी नोटांच्या बदल्यात मतदान मागणार नाही. उलट ठुमक्यांनीच मी तिथल्या लोकांची मने जिंकेन. राखीने हेही सांगितले की तिच्याकडे कोणत्याही प्रकारचे काळा पैसा नाहीये आणि ती मोदींच्या या निर्णयाचे समर्थन करते.