बॉलिवूडची ड्रामा क्वीन अभिनेत्री राखी सावंत ही कायमच काही ना काही कारणामुळे कायमच चर्चेत असते. राखीने काही दिवसांपूर्वी तिचा पती आदिल दुर्रानीवर घरगुती हिंसाचार, चोरी, फसवणूक असे अनेक गंभीर आरोप केले होते. त्यानंतर आदिलवर गुन्हा दाखल करुन त्याला अटक करण्यात आली होती. त्यानंतर आता राखीचा भाऊ राकेश सावंत याला पोलिसांनी अटक केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, राखी सावंतचा भाऊ राकेश सावंत याला चेक बाऊन्सप्रकरणी अटक करण्यात आली आहे. राकेशला ओशिवरा पोलिसांनी ७ मे रोजी अटक केली होती. त्यानंतर त्याला ८ मे रोजी न्यायालयात हजर करण्यात आले. त्यावेळी न्यायलयाने राखीचा भाऊ राकेशला २२ मे पर्यंत न्यायलयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. राकेश सावंत दिग्दर्शक, निर्माता आणि लेखक आहे.
आणखी वाचा : ‘वेड’ चित्रपटातील बालकलाकार खुशीबरोबर सायली संजीवचे नशीब उजळले, म्हणाली “हा फोटो…”
नेमकं प्रकरण काय?
एका व्यावसायिकाने २०२० मध्ये राकेशविरोधात तक्रार दाखल केली होती. याप्रकरणी राकेशला अटक करण्यात आली होती. त्यानंतर त्याची जामिनावर सुटका करण्यात आली. यावेळी चेक बाऊन्स प्रकरणी त्या व्यावसायिकाला पैसे परत करावेत, या अटीसह जामीन देण्यात आला होता. मात्र न्यायलयाने दिलेली ही अट राकेशला पूर्ण करता आली नाही. त्यामुळे आता राकेशला १३८ ए, कोर्ट केस नंबर ९६/एसएस/२०२१ अंतर्गत जामीनपात्र वॉरंटवर पुन्हा अटक केली आहे. येत्या २२ मे पर्यंत राकेशला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.
आणखी वाचा : “दारु, लव्ह बाइट्स अन्…” विजय देवरकोंडाने केलेला सेक्स लाईफबद्दल मोठा खुलासा
दरम्यान राखी सावंत ही ‘बिग बॉस मराठी’मध्ये झळकली होती. ती सोशल मीडियावर कायमच सक्रीय असते. ती अनेक फोटो आणि व्हिडीओ शेअर करताना दिसते. राखी सावंतची या वर्षाची सुरुवात अनेक वादामुळे सुरु झाली. राखीने आदिल दुर्राणीसोबतच्या लग्नाचे फोटो दाखवून लग्न केल्याचे उघड केले. मात्र आदिलने हे लग्न झाल्याचे नाकारले होते. त्यानंतर आता राखीने आदिलविरुद्ध घरगुती अत्याचार, चोरी आणि फसवणूक केल्याप्रकरणी तक्रार दाखल केला होता. त्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करत त्याला अटक केली होती.