बॉलिवूडची ड्रामा क्वीन अभिनेत्री राखी सावंत कोणत्या ना कोणत्या कारणांमुळे सोशल मीडियावर चर्चेत असते. आता राखीचा एक व्हिडीओ प्रचंड व्हायरल झाला आहे. राखीला आणि तिच्या कुटुंबाला करोनाची लागण होऊ शकतं नाही यादा दावा तिने केला आहे.

बॉलिवूड सेलिब्रिटी फोटोग्राफर विरल भय्यानीने त्याच्या इन्स्टाग्राम पेजवर हा व्हिडीओ शेअर केला आहे. मुंबईतील लोखंडवाला परिसरातील एका कॉफी शॉपच्या बाहेर राखी होती. यावेळी फोटोग्राफर्सशी करोना व्हॅक्सिनच्या कमतरतेवर राखीने चर्चा केली. “देशात करोना व्हॅक्सिनची कमतरता आहे. त्यामुळे माझी इच्छा आहे की मला मिळणारी लस ही गरजूंना मिळाली पाहिजे. मला करोना होऊ शकतं नाही, कारण माझ्या शरीरात येशुचं पवित्र रक्त आहे. त्यामुळेच मला आणि माझ्या कुटुंबाला करोनाची लागण होणार नाही,” असं राखी म्हणाली.

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

राखी पुढे म्हणाली, “मी माझ्या सगळ्या वाईट सवयी सोडल्या आहेत. फक्त थोडा राग येतो मला आणि तेही ठीक होईल.” राखीच्या या व्हिडीओवर अनेकांनी कमेंट केली आहे. एक नेटकरी म्हणाला, “तुझ्या शरीरात येशुचं पवित्र रक्त आहे तर तू रक्त दान कर.” दुसरा नेटकरी म्हणाला, “राखी खूप गोंडस आहे.” अशा कमेंट करत कोणी राखीला बालिश म्हटलं आहे तर कोणी राखीला ट्रोल केलं आहे.

दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून राखी तिच्या पतीमुळे चर्चेत आहे. रितेश असे राखीच्या पतीचे नाव आहे. तिच्या पतीला अजून कोणी पाहिले नाही. त्यामुळे ती खोटं बोलत असल्याचे आरोप अनेकांनी तिच्यावर केले होते.

Story img Loader