बिग बॉस १५ च्या महाअंतिम सोहळ्याला आता अवघे ४ दिवस बाकी आहेत. त्याआधी राखी सावंत बिग बॉसच्या घरातून बाहेर पडली. याबाबत राखी सावंतनं स्वतःच एका व्हिडीओमधून माहिती दिली आहे. यासोबत बिग बॉसच्या घरातून बाहेर पडल्यानंतर राखी सावंत तिचा पती रितेशसोबत डिनर डेटला जाताना दिसली. राखीनं इन्स्टाग्रामवर तिच्या डिनर डेटचा व्हिडीओ शेअर केला आहे.

राखी सावंतनं तिच्या इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यात ती पती रितेशसोबत डिनर एन्जॉय करताना दिसत आहे. व्हिडीओमध्ये राखीनं बिग बॉसच्या घरात असताना रितेशची खूप आठवण आल्याची कबुली दिली आहे. यासोबतच या व्हिडीओमध्ये तिने रितेशची झलकही दाखवली आहे. राखी सावंतचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर बराच चर्चेत आहे.

True love Viral Video
‘बायको, तू फक्त साथ दे..’ खऱ्या प्रेमाचं उदाहरण दाखविणारा सुंदर VIDEO एकदा पाहाच…
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
Shocking Video
Video : तुफान राडा! दोन तरुणी भिडल्या अन् एकमेकींच्या झिंज्या उपटल्या, व्हिडीओ पाहून नेटकरी म्हणाले, “बॉयफ्रेंडसाठी..”
Tejashri Pradhan First Post Share after exit premachi goshta serial
“काही वेळेला बाहेर पडणं…”, ‘प्रेमाची गोष्ट’ मालिकेला रामराम केल्यानंतर तेजश्री प्रधानची पहिली पोस्ट, म्हणाली, “तुमची कुवत…”
American foreign girl married to indian man and shared her after marriage experience
सासर असावं तर असं! भारतीय मुलाशी लग्न करून बदललं आयुष्य, अमेरिकन महिला VIDEO शेअर करत म्हणाली…
bigg boss 18 actor shalin bhanot first time talk about dating rumours with eisha singh
Video: “माझं नाव घेऊन एका मुलीच्या चारित्र्यावर…”, अखेर शालीन भनोटने ईशा सिंहबरोबरच्या अफेअरच्या चर्चांवर सोडलं मौन, म्हणाला…
Vivian Dsena ex wife Vahbbiz Dorabjee left Deewaniyat Serial
Bigg Boss 18 फेम विवियन डिसेनाच्या पहिल्या बायकोने एका महिन्यात सोडली मालिका, ७ वर्षांनी केलेलं पुनरागमन; नेमकं काय घडलं?
prince narula yuika chaudhary girl name
बिग बॉस फेम जोडप्याच्या मुलीचे नाव आले समोर, ‘हा’ आहे नावाचा अर्थ; ‘त्या’ पोस्टमुळे पती पत्नीत मतभेद असल्याची चर्चा

याआधी राखी सावंत बिग बॉसच्या घरातून बाहेर पडल्यानंतर एका जिमच्या बाहेर स्पॉट झाली होती. त्यावेळी फोटोग्राफर्सशी बोलताना तिने आपण बिग बॉसच्या घरातून बाहेर पडल्याचं सांगितलं होतं. त्यावर काही फोटोग्राफर्सनी तिला, ‘बिग बॉसचा विजेता कोण होणार?’ असा प्रश्न विचारला होता आणि यावर राखीनं ‘मला माहीत नाही की विजेता कोण होईल’ असं उत्तर दिलं होतं.

दरम्यान काही दिवसांपूर्वी राखी सावंतनं तिच्या पती बद्दल वक्तव्य करताना, ‘त्याने जर मला लग्नाचं प्रमाणपत्र दिलं तर त्यांच्यासोबत पुढच्या आयुष्याचा विचार करेन अन्यथा आम्ही वेगळं होणंच योग्य आहे.’ असं म्हटलं होतं. ज्याची सोशल मीडियावर बरीच चर्चा झाली होती. पण आता या दोघांमधील बॉन्डिंग पाहता त्यांच्यात सर्व काही ठीक आहे असंच दिसून येत आहे.

Story img Loader