अभिनेत्री राखी सावंत गेल्या कित्येक दिवसांपासून अनेक गोष्टींमुळे चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वीच राखीने बॉयफ्रेंड आदिल खानबरोबर लग्न केल्याचा खुलासा केला. अनेक दिवस ड्रामा केल्यानंतर अखेर आदिलने तिच्याशी लग्न केल्याचं कबूल केलं. दुसरीकडे तिची आई रुग्णालयात उपचार घेत आहे. तिची आई ब्रेन ट्युमर या आजारामुळे त्रस्त आहे. अशातच तिचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे.

‘बिग बॉस’च्या घरातून बाहेर पडल्यावर ‘ड्रामा क्वीन’ राखी सावंत वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत आली. सध्या रुग्णालयात दाखल असलेल्या राखीच्या आईची तब्येत प्रचंड खालावली आहे, आणि त्यासाठी राखी वेगवेगळे प्रयत्न करताना दिसत आहे. नुकतंच राखीने एका ‘NGO’ला भेट दिली आणि तिथल्या मुलांना तिने पैसे वाटप केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे.

Gashmeer Mahajani
“परत तिच्या कुशीत…”, गश्मीर महाजनी आईबद्दल बोलताना म्हणाला, “घरी दोन लहान मुलं…”
Mahayuti Government
Shiv Sena : महाराष्ट्राला लवकरच तिसरा उपमुख्यमंत्री मिळणार,…
village near Dombivli brother of private tution teacher sexually assaulted eight year old girl
डोंबिवलीत खासगी शिकवणी चालिकेच्या भावाचा बालिकेवर लैंगिक अत्याचार
Nagpur It is now possible to know status of autopsy report in AIIMS with click police as well as family
एम्समधील शवविच्छेदनाची स्थिती आता एका ‘क्लिक’वर, पोलीस, नातेवाईकांची पायपीट थांबणार
Walmik Karad Mother Parubai Karad
Walmik Karad : वाल्मिक कराडवर मकोका लावल्यानंतर आईची पहिली प्रतिक्रिया; म्हणाल्या, “आता मी मेल्यावर पाणी पाजायला…”
Image Of Anjali Damania And Walmik Karad
Walmik Karad : “एका वाया गेलेल्या मुलाबरोबर…” आंदोलनाला बसलेल्या वाल्मिक कराडच्या आईला अंजली दमानियांचे ६ प्रश्न
Dahanu devotee loksatta news
डहाणू : महालक्ष्मी गडावर गेलेल्या भाविकाचा हृदय विकाराच्या झटक्याने मृत्यू
Nandurbar district nurse murder, murder Nandurbar district, Nandurbar district,
नंदुरबार जिल्ह्यातील परिचारिकेच्या हत्येची उकल

आणखी वाचा : Tu Jhoothi Main Makkaar Trailer : नव्या पिढीचे प्रेमाबद्दलचे विचार हटके पद्धतीने मांडणाऱ्या रणबीर – श्रद्धाच्या ‘तू झूठी मैं मक्कार’चा ट्रेलर प्रदर्शित

या व्हिडिओमध्ये ती लहान मुलांना ५०० रुपये वाटताना दिसत आहे, शिवाय स्वतःच्या आईच्या तब्येतीसाठी त्यांनी प्रार्थना करावी अशीही ती विनंती करत आहे. या लहान मुलांना भेटल्यावर राखी खूपच खुश झाली, तिच्या चेहेऱ्यावर तो आनंद दिसतच होता. नुकतंच आईला भेटल्यानंतर राखी रुग्णालयाबाहेर येत मीडियासोबत संवाद साधल्यावर तिला लोकांनी प्रचंड ट्रोल केलं. लोकांना तिचं हे वागणं हे प्रचंड नाटकी वाटत आहे.

गुरुवारी(१९ जानेवारी) रोजी राखीला शर्लिन चोप्रा प्रकरणात अटक करण्यात आली. सहा तासांच्या चौकशीनंतर पोलिसांकडून राखीची सुटका करण्यात आली. राखीच्या आईला ब्रेन ट्यूमर झालेला आहे, काही वर्षांपासून त्या आजारी आहेत, पण सध्या मात्र त्यांची प्रकृती चांगलीच खालावली असल्याचं सांगितलं जात आहे. राखी सध्या सोशल मीडियावरून आईच्या प्रकृतीसाठी प्रार्थना करण्याची विनंती करत आहे.

Story img Loader