बॉलिवूडची ‘ड्रामा क्वीन’ म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री राखी सावंत ही कोणत्या ना कोणत्या कारणामुळे नेहमीच चर्चेत येत असते. टोकियो ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक मिळवून देणाऱ्या भारताचा भालाफेकपटू नीरज चोप्राला पाहून आता राखी सावंत सुद्धा प्रेरित झालीय. त्याच्यासारखं भालाफेकी करण्यापासून ती स्वतःला आवरू शकली नाही. मुंबईतल्या भररस्त्यात राखी सावंत नीरज चोप्राच्या स्टाइलमध्ये भालाफेकी करताना दिसून आली. याचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय.
टोक्यो ऑलिम्पिक २०२० मध्ये भारताच्या नीरज चोप्राने भालाफेक प्रकारात देशासाठी पहिले सुवर्णपदक मिळविले आणि भालाफेक या खेळाबाबत एकच चर्चा सुरु झाली. या खेळाबाबतची उत्कंठता राखी सावंत सुद्धा आवरू शकली नाही. तिने तर चक्क मुंबईतल्या रस्त्यावर उतरून भालाफेकी केली. तिच्या या चित्रविचित्र भालाफेकीचा व्हिडीओ तिने स्वतः इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर केलाय. ‘कृपया मला सुद्धा सुवर्णपदक द्या’ असं लिहित तिने हा व्हिडीओ शेअर केलाय. त्यानंतर हा व्हिडीओ सोशल मीडियावर वाऱ्यासारखा पसरलाय.
राखी सावंतने शेअर केलेल्या या व्हिडीओमध्ये तिच्या हातात भाला नव्हे तर एक काठी आहे. या भालाफेकीच्या उत्साहाच्या भरात राखी सावंतचा निशाणा चुकला आणि तो थेट रस्त्यावरून चालत जाणाऱ्या एका वाटसरूच्या डोक्यावर जाऊन पडली. यावर तो वाटसरू राखी सावंतला म्हणाला, “अरे हे काय सुरूये”. त्यावर “प्रयत्न तर केला ना मी…कडक फेकला ना? उत्तम फेकला ना?” असं राखी सावंत विचारते. शेवटला जय हो आणि जय हिंदचा जयघोष करत ती आपल्या गाडीत बसून निघून जाते.
राखी सावंतहा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय. तिच्या या विचित्र व्हिडीओ फॅन्स वेगवेगळे कमेंट्स देताना दिसून येत आहेत. “अरे गजबच..ऑलिम्पिकची तयारी आहे का?”, “तुम्ही खूपच कॉमेडिअन आहा राखी मॅम” अशा वेगवेगळ्या कमेंट्स तिचे फॅन्स देत आहेत. “अतिशय साफ मनाच्या”, “इतर नौटंकीपेक्षा बरंच चांगलंय” अशी कमेंट्स तिच्या या व्हिडीओवर दिसून येत आहेत. काही फॅन्सनी तर ट्रोल करण्याचा प्रयत्न केला. पण राखी सावंत आपला बिनधास्त अंदाज काही सोडायला तयार नाही.