लोकसभा निवडणुकीत अपयश पदरी पडल्यानंतर राखी सावंतने आज(शनिवार) रिपब्लिकन पक्षात जाहीर प्रवेश केला. राखी सावंतच्या पक्षप्रवेशावेळी रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष रामदास आठवलेसुद्धा उपस्थित होते. यावेळी राखी सावंतकडे रिपब्लिकन पक्षाच्या वुमन सेलचा पदभार सोपवण्यात आला.  राखी सावंतने मुंबईच्या उत्तर-पश्चिम मतदारसंघातून यंदाची लोकसभा निवडणुक लढविली होती. त्यासाठी निवडणुकांच्या तोंडावर राखीने स्वत:चा राष्ट्रीय आम पक्षसुद्धा काढला होता. मात्र, मतदारांनी राखीच्या पारड्यात फक्त १,९९७ मते टाकली होती.  राखी सावंतच्या पक्षात येण्याने राजकीय वर्तुळात रिपब्लिकन पक्षाला ग्लॅमर मिळणार का हे पाहणे औत्स्युकाचे ठरेल. 

Story img Loader