राखी सावंत आणि तिचा पूर्वश्रमीचा पती रितेश यांच्यात आता नवा वाद निर्माण झाला आहे. हा वाद कोर्टात पोहोचण्याची शक्यता देखील नाकारता येत नाही कारण राखीची पूर्वश्रमीचा पती रितेशनं तिच्या विरोधात कायदेशीर कारवाई करणार असल्याची धमकी दिली आहे. राखी सावंतनं अलिकडेच रितेशवर फेसबुक, इन्स्टाग्राम आणि जीमेल अकाउंट हॅक करण्याचा आरोप केला आहे. राखीनं सांगितलं होतं की रितेश तिला वारंवार धमकी देत असून त्याने सर्व सोशल मीडिया अकाउंट हॅक केले आहेत. यासंबंधी राखी सावंतनं ओशिवारा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पण आता यावर रितेशनं प्रतिक्रिया दिली आहे.

‘ई-टाइम्स’शी बोलताना रितेशनं राखी सावंतकडून करण्यात आलेल्या आरोपांचं खंडन केलं आहे. तो म्हणाला, “मी तिच्या आरोपांचं उत्तर कायदेशीर पद्धतीने देणार आहे. सर्व परिस्थिती सर्वांना माहीत आहे. मी तिच्यासाठी कोट्यावधी रुपये खर्च केले. त्यावेळी राखीला पैसे घेताना कोणतीही समस्या नव्हती. जेव्हा मी तिच्यावर पैसे खर्च करणे बंद केले तेव्हापासून तिने माझ्यावर अशाप्रकारचे आरोप करणं सुरू केलं. तुम्ही कोणतंही नातं अशाप्रकारे एका इन्स्टाग्राम पोस्टवर संपताना पाहिलं आहे का? भविष्यात ती माझ्यावर आणखी आरोप करु शकते “

Mokka crime fugitive arrested from Karnatak Pune news
Pune Crime News: मोक्काच्या गुन्ह्यातील फरारीला कर्नाटकातून अटक
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
justice shekhar yadav controversial statement
अन्वयार्थ : ‘सांविधानिक भावना दुखावण्या’पल्याड…
Santosh Deshmukh Murder Case
“…म्हणून माझ्यावर ही वेळ आली का?” मयत सरपंच संतोष देशमुखांच्या आईचा टाहो; पत्नी म्हणाली, “ते १५ वर्षांपासून..”
supreme court marital dispute case
‘नवरा आणि सासरच्या लोकांचा छळ करण्यासाठी कायद्याचा दुरूपयोग नको’, सर्वोच्च न्यायालयाची महत्त्वपूर्ण टिप्पणी
Atul Subhash
“मर्द को भी दर्द होता है!” आत्महत्येआधीचा अतुलचा तासभराचा ‘तो’ व्हिडिओ व्हायरल; पत्नी आणि सासरच्यांवर गंभीर आरोप
Dismissed police officer killed woman with scarf over immoral relationship
नागपूर : अनैतिक संबंध! बडतर्फ पोलीस कर्मचाऱ्याने प्रेयसीचा गळा आवळला, मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी…
Pimpri-Chinchwad:, Husband girlfriend beaten,
पिंपरी-चिंचवड: नवऱ्याच्या प्रेयसीला आणि मध्यस्थी करणाऱ्या महिलेला पत्नीने घडवली अद्दल; प्रकरण थेट पोलीस ठाण्यात

आणखी वाचा- कतरिनाच्या आयुष्यात ‘सवती’ची एंट्री? पती विकी कौशलच्या फोटोवरील कमेंट चर्चेत

रितेश पुढे म्हणाला, “आता राखी म्हणेल की ती आणि आदिल बिग बॉसच्या घरात जाणार आहेत. ती हा सर्व ड्रामा पुन्हा करेल. मी राखीपासून खूप दूर माझ्या आयुष्यात खूप खूश आहे. तिने मला खूपच मानसिक त्रास दिला आहे. पण आता मी तिच्यापासून दूर आहे. मागची तीन वर्ष ती माझा फायदा घेत घेत होती. ना तिच्याकडे कार होती ना घरातील कोणत्या वस्तू. आज तिच्या घरात ज्या काही गोष्टी आहेत त्या सर्व मी तिला विकत घेऊन दिल्या आहेत. ती एवढी निर्लज्ज आहे की दुसऱ्या पुरुषांना ती बेकायदेशीररित्या ठेवलं आहे आणि मी दिलेल्या वस्तू ती वापरत आहे.”

आणखी वाचा- “अजूनही वाटतं दिदींचा कॉल येईल…” आशाताईंनी दिला लता मंगेशकर यांच्या आठवणींना उजाळा

याशिवाय रितेशनं यावेळी त्याची पहिली पत्नी स्निग्धाचाही उल्लेख केला आहे. तो म्हणाला, “स्निग्धाने माझ्यासोबत जे केलं तसंच राखी देखील वागली. आता या दोघीही त्या पुरुषांसोबत आहेत ज्याच्यासोबत त्यांना राहायचं होतं. स्निग्धा दिल्लीत तर राखी मुंबईत आहे. दोघांनीही माझा गैरफायदा घेतला. राखीने तर माझं शोषण केलं. पण आता मी तिच्यावर कायदेशीर कारवाई करणार आहे.”

Story img Loader