ड्रामा क्वीन राखी सावंत ही गेल्या काही दिवसांपासून सातत्याने चर्चेत आहे. बिग बॉसच्या १५ व्या पर्वात राखीने तिचा पती रितेशची सर्वांना ओळख करुन दिली होती. बिग बॉसमधून बाहेर पडल्यानंतर अनेकदा ते दोघेही एकत्र दिसले होते. मात्र काही दिवसांपूर्वी राखीने पती रितेशपासून वेगळं होत असल्याची घोषणा केली. पण राखीपासून वेगळं झाल्यानंतरही रितेश राखीचे फोटो सतत पोस्ट करत असतो. नुकतंच यावरुन रितेश आणि राखीमध्ये मोठा वाद झाला.
राखीचा पूर्वाश्रमीचा पती रितेशने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर राखी सावंतचा एक फोटो पोस्ट केला आहे. या फोटोला दिलेल्या कॅप्शनने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आहे. “राखी जी एक सूचना आहे. कृपया कोणत्याही गेम शोमध्ये तू कधीही माझ्यासमोर येऊ नकोस. अन्यथा मी तुझा अशाप्रकारे बँड वाजवेन की तू पुन्हा कोणत्याही शोला जाणार नाहीस. ‘बिग बॉस 15’ च्या वाईल्ड कार्डचे काय झाले ते तुम्हाला आठवते का? त्यामुळे थंड व्हा”, असे रितेशने म्हटले आहे.
रितेशच्या या पोस्टवर राखी सावंतनेही कमेंट करत रिप्लाय दिला आहे. त्यावर राखी सावंत म्हणाली की, ‘तुझे नाटक बंद कर’. यावर रितेशनही तिला प्रत्युत्तर दिले आहे. तो म्हणाला की, ‘तू ड्रामा क्वीन आहेस’. यानंतर राखीने रितेशला कमेंट करत ‘माझा फोटो वापरु नको’, असे सांगितले. त्यावर उत्तर देताना रितेश म्हणाला, “मॅडम, तुम्ही माझे नाव वापरणे बंद करा आणि मी तुमचे चित्र वापरणे बंद करेन. तुम्ही मला एका गेम शोमध्ये भेटा. मग मी तुम्हाला सांगेन.”
राखी आणि रितेशचे इन्स्टाग्रामवरील भांडण पाहून चाहतेही चांगलेच संतप्त झाले आहेत. रितेशच्या या पोस्टवर अनेकांनी त्याला समर्थन दिले आहे. तर राखीच्या चाहत्यांनी मात्र रितेशला ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे. रितेश आणि राखीचे हा वाद सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.
“मी त्याला थेट ब्लॉक करणार…”, फरहान अख्तरच्या लग्नानंतर पूर्वाश्रमीच्या पत्नीची ‘ती’ पोस्ट चर्चेत
दरम्यान काही दिवसांपूर्वीच राखीनं तिच्या इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करत तिच्या घटस्फोटाची माहिती दिली होती. या पोस्टमध्ये तिनं पती रितेशपासून वेगळं होत असल्याचं म्हटलं होतं. ‘बिग बॉस १५ मधून बाहेर पडल्यानंतर बरंच काही घडून गेलं आहे. आम्ही आमचं नातं वाचवण्याचा पूर्ण प्रयत्न केला मात्र आम्हाला यात अपयश आलं. अखेर आम्ही वेगळं होण्याचा निर्णय घेतला.’ असं राखीनं तिच्या पोस्टमध्ये म्हटलं होतं.