ड्रामा क्वीन राखी सावंत पुन्हा एकदा चर्चेत आहे. तिचा पती आदिल खान दुर्रानी सहा महिन्यांनी तुरुंगातून बाहेर आला आहे. तुरुंगातून जामीनावर सुटलेल्या आदिलने त्याच्या वकिलाबरोबर पत्रकार परिषद घेतली. यामध्ये त्याने राखीवर अनेक गंभीर आरोप केले आहेत. राखीने आपले न्यूज व्हिडीओ बनवले, तिने ड्रग्ज दिले, असं आदिल म्हणाला होता.

इतकंच नव्हे तर राखीने पहिला पती रितेशपासून घटस्फोट न घेताच आपल्याशी लग्न केल्याचा दावा आदिल खानने केला. याबरोबरच राखी आणि रितेश मध्यंतरी लंडनमध्ये एकाच हॉटेलमध्ये एकत्र राहिल्याचाही दावा आदिलने केला आहे. हे प्रकरण तापलं असतानाच आता नुकतंच राखी सावंतनेही पत्रकार परिषद घेतली आहे.

atul subhash
Atul Subhash Suicide Case : अतुल सुभाषच्या सासू आणि मेव्हण्याने केलं पलायन; पोलीस म्हणतात, “त्यांना नजरकैदेत…”
Viral Trend Chastity Belts:
Chastity Belt: योनी शुचिता पट्ट्याचा इतिहास आणि त्यामागील…
mla sanjay rathod upset over baseless news spread against him by media
“मन दुखावले, जिव्हारी लागले…” आमदार संजय राठोड असे का म्हणाले?
rashmika mandanna salman khan
“मी आजारी आहे समजल्यावर…” रश्मिका मंदानाने सांगितला सलमान खानबरोबर काम करतानाचा ‘तो’ किस्सा, म्हणाली, “स्वप्न…”
kareena kapoor lal singh chadhha aamir khan
‘लाल सिंग चड्ढा’च्या अपयशाने निराश झाला होता आमिर खान, करीना कपूर खानने केला खुलासा; म्हणाली…
Shivsena UBT News
Shiv Sena UBT : “ठाकरेंच्या शिवसेनेला नाकारण्याचा जनतेचा निर्णय किती योग्य, हेच पुन्हा अधोरेखित होतंय”, भाजपा नेत्याची आगपाखड
ravi rana resign
अमरावती : नवनीत राणा म्‍हणतात, “…तर रवी राणा देखील राजीनामा देतील”
Ramdas Athawale On Raj Thackeray
Ramdas Athawale : “मी असताना राज ठाकरेंची महायुतीत गरज काय?”, रामदास आठवलेंचं मोठं विधान

या पत्रकार परिषदेत राखीने तिचा पहिला पती रितेशलाही व्हिडीओ कॉलच्या माध्यमातून जोडलं आहे. रितेशने या पत्रकार परिषदेत आदिलने लावलेले आरोप धादांत खोटे असल्याचं सांगितलं असून आपल्या पासपोर्टवरील एंट्रीसुद्धा त्याने या व्हिडीओ कॉलच्या माध्यमातून पत्रकारांना दाखवल्या आहेत.

आणखी वाचा : सुपरहीट चित्रपटातून पदार्पण, मोठ्या दिग्दर्शकाशी अफेअर अन् त्याच्याच घरात हत्या; ‘या’ अभिनेत्रीला ओळखलंत का?

आदिलने लावलेल्या आरोपांबद्दल रितेश म्हणाला, “मी एक क्षत्रिय आहे, त्या दिवशी मी राखीबरोबर लंडनच्या हॉटेलमध्ये होतो हे जर आदिलने पुराव्यांसह सिद्ध करून दाखवलं तर मी आज संपूर्ण मीडियासमोर सांगतो मी थुंकी चाटायलाही पुढे मागे बघणार नाही, मी स्वतःला जोड्याने मारून घेईन जर त्याने ही गोष्ट सिद्ध केली तर, आणि जर तो हे सिद्ध करू शकला नाही तर मी त्याच्याविरोधात कायदेशीर कारवाई करेन.”

दरम्यान, फेब्रुवारी महिन्यात राखीने पती आदिल खानवर मारहाणीचे व फसवणुकीचे आरोप केले होते. त्यानंतर आदिलला पोलिसांनी अटक केली होती. त्याच्यावर म्हैसूरमधील एका तरुणीनेही अत्याचाराचा आरोप केला होता. दोन्ही प्रकरणात आदिल गेले सहा महिने तुरुंगात होता. आता जामीन मिळाल्यानंतर तो राखीने त्यावेळी केलेल्या आरोपांना उत्तर देत नवनवीन खुलासे करत आहे.

Story img Loader