छोट्या पडद्यावरील ‘बिग बॉस’ हा शो वादग्रस्त आणि तितकाच लोकप्रिय शो आहे. ‘बिग बॉस’चे यंदाचे हे १५ वे पर्व सुरु आहे. हा शो सुरु झाल्यापासून वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. गेल्या काही दिवसांपासून राखी आणि तिचा पती रितेश सतत चर्चेत आहेत. शोमध्ये रितेश राखीसोबत ज्या प्रकारे वागतो ते ना प्रेक्षकांना आवडलं ना सुत्रसंचालक सलमान खानला. तर काही दिवसांपूर्वी रितेश आणि त्याच्या पहिल्या पत्नीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
नुकत्याच प्रदर्शित झालेल्या एपिसोडमध्ये रितेश ‘बिग बॉस’च्या घरातून बाहेर पडला आहे. आता रितेशच्या पहिल्या पत्नीनीच्या भावाने म्हणजेच रविकांत कुमारने बिहारमध्ये बेतिया जिल्ह्यातल्या पोलिस अधीक्षकाला विनंती केली आहे की रितेशने दुसरे लग्न केल्यामुळे त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे.
आणखी वाचा : मुलीकडे KISS मागण्यावरून अभिजित बिचुकलेवर संतापली देवोलिनाची आई, म्हणाली…
पश्चिमी चंपारण एसपी उपेन्द्र नाथ वर्मा म्हणाले की रविकांत कुमारने विनंती केली आहे की, त्यांची बहिण स्निग्धा प्रियाने २०१४ मध्ये सेवानिवृत झालेल्या स्टेशन मास्टर राजेथ प्रसाद यांचा मुलगा रितेशशी झाले. लग्न हे बेतियाच्या एका हॉलमध्ये झाले होते. लग्नाच्या काही दिवसांनंतर रितेश त्याची बहिण आणि त्याचे आई-वडिल तिची मारहाण करायचे. याविषयी आधीही तक्रार दाखल करण्यात आली होती.
आणखी वाचा : ‘अंगात आलया’ सिद्धूचा डान्स पाहून रणवीर सिंग फिदा कमेंट करत म्हणाला…
ते म्हणाले की, नुकतच रितेशला ‘बिग बॉस १५’ मध्ये राखीचा पती म्हणून दाखवण्यात आले आहे. जे चुकिचं आहे कारण रितेश आणि स्निग्धाचा घटस्फोट झालेला नाही. रविकांत कुमार यांच्या तक्रारिवरून नगर पोलिस त्याची तपासनी करत आहेत. त्यानंतरच रितेश विरोधात तक्रार दाखल केली जाईल. मीडियाने रिपोर्टनुसार, रितेशची आई मधुबाला यांना सुद्धा त्यांच्या मुलाच्या दुसऱ्या लग्नाविषयी काही माहित नाही आहे. त्यांना देखील माहित नाही की रितेशने राखीशी लग्न केले. त्यांनी सांगितले की रितेशने आयआयटीतून इंजीनियरिंग करत बंगळुरु काम करत होता. काही दिवासांपासून त्याच्याशी काही बोलणं झालेलं नाही. ज्यानंतर तो अचानक बिग बॉस १५ दिसला.