राखी सावंतचा पती राकेश सातत्यानं त्याच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आहे. एकीकडे बिग बॉसच्या घरातून बाहेर पडल्यानंतर राकेशनं त्याच्या आयुष्यातील अनेक मोठे खुलासे केले आहेत तर दुसरीकडे रितेशची पहिली पत्नी स्निग्धा प्रिया हिने त्याच्यावर बरेच गंभीर आरोप केले आहेत. या सर्वच गोष्टींची सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू आहे. अशात आता रितेशनं पहिली पत्नी स्निग्धा प्रियाच्या विरोधात कायदेशीर कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे.


नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत रितेश म्हणाला, ‘स्निग्धा दुसऱ्या व्यक्तीसोबत पळून गेली होती आणि नंतर पुन्हा माझ्याकडे आली. आमच्या मुलासाठी मी तिला माफ केलं आणि नव्यानं सुरुवात केली होती. पण ती पुन्हा पळून गेली त्यावेळी मी घटस्फोटासाठी अर्ज दिला होता. घटस्फोटाबाबत कळल्यानंतर तिच्या कुटुंबीयांनी मला जीवे मारण्याची धमकी दिली होती. पण मी माझ्या मुलासाठी नेहमीच गप्प राहिलो.’


रितेश पुढे म्हणाला, ‘मी आता तिच्या विरोधात कायदेशीर कारवाई करणार आहे. मी माझ्या मुलाचा विचार करून अनेकदा तिच्यावर कायदेशीर कारवाई करण्याचा विचार सोडून दिला. पण आता मी कायद्याची मदत घेणार आहे. ती आणि तिच्या कुटुंबीयांवर मी मानसिक शोषण केल्याबद्दल खटला दाखल करणार आहे.’


पहिल्या पत्नीनं लावलेल्या आरोपांबद्दल बोलताना राकेश म्हणाला, ‘तिने लावलेले सर्व आरोप खोटे आहेत. मी बिग बॉसच्या घरात असल्यानं स्वतःची बाजू मांडू शकत नव्हतो. याच गोष्टीचा तिने फायदा घेतला. तिने माझ्यावर चुकीचे आरोप लावले आहेत. जर ती माझ्यासोबत राहतच नाही तर तिला मारहाण करण्याचा प्रश्नच येत नाही.’

Story img Loader