काही वर्षांपूर्वी बॉलिवूडमध्ये आयटम गर्ल म्हणून आपल्या डान्सने सगळ्या प्रेक्षकांना वेड लावणारी अभिनेत्री म्हणजे राखी सावंत. काही काळानंतर ती मोठ्या पडद्यापासून दूर गेली होती. दरम्यान, राखी ‘बिग बॉस’मुळे पुन्हा एकदा चर्चेत आली होती. बिग बॉस संपल्यापासून कोणत्या ना कोणत्या कारणामुळे राखी सगळ्या प्रेक्षकांचे लक्ष आपल्याकडे वेधुन घेते. आता राखी एका व्हिडीओमुळे पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. राखीचा क्लबमधील एक व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होताना दिसत आहे.
हा व्हिडीओ राखीने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केला आहे. हा व्हिडीओ गोव्यातील आहे. सध्या राखी गोव्यात सुट्टीचा आनंद घेताना दिसत आहे. व्हिडीओत राखी क्लबमध्ये गाणं गात डान्स करताना दिसत आहे. या व्हिडीओत ती ‘परदेसीया’ हे सुपरहिट गाणं गाणतं आहे. सोबतच ‘बिग बॉस १४’ मधील मीम सॉंग ‘क्या ये सांडनी थी’ या गाण्यावर देखील तिने परफॉर्म केलं आहे. हा व्हिडीओ शेअर करत “गोव्यात खूप मजा करत आहे”, अशा आशयाचे कॅप्शन राखीने दिले आहे.
View this post on Instagram
छोट्या पडद्यावरिल ‘बिग बॉस’ या वादग्रस्त आणि लोकप्रिय शोच्या चौदाव्या पर्वात राखी स्पर्धक म्हणून सहभागी झाली. तिने सगळ्या स्पर्धकांना चांगली टक्कर दिली. तर राखीने प्रेक्षकांचे चांगले मनोरंजन केले, तिच्यात आलेल्या आत्मापासून तिच्या लग्नापर्यंत अनेक गोष्टींवर राखीने बिग बॉसच्या घरात चर्चा केली. रूबीना दिलैक बिग बॉसची विजेती ठरली आणि राहुल वैद्य उपविजेता ठरला.