गेल्या काही दिवसांपासून ड्रामा क्वीन राखी सावंत व आदिल खानच्या लग्नाची चर्चा सुरू आहे. राखीने बॉयफ्रेंड आदिल खान दुर्रानीशी सात महिन्यांपूर्वी लग्न केलं होतं.लग्नाचे फोटो आणि व्हिडीओ शेअर करत तिने विवाहबंधनात अडकल्याची माहिती सोशल मीडियाद्वारे दिली. दरम्यान लग्नाची बातमी सांगितल्यानंतर आदिलवर तिने बरेच आरोपही केले. आता तिने एक व्हिडीओ शेअर केला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आणखी वाचा – ‘वेड’ चित्रपट बनवण्यासाठी रितेश देशमुखने खर्च केले इतके कोटी रुपये, बॉक्स ऑफिस कलेक्शनमध्येही घसघशीत वाढ

आदिल बोलत नसल्याचा आरोप राखीने केला होता. यावर आदिलने स्वतः प्रतिक्रिया दिली आहे. आमच्यामध्ये सगळं सुरळीत सुरू असल्याचं आदिलचं म्हणण आहे. दरम्यान राखीनेही एक नवा व्हिडीओ शेअर केला आहे. यामध्ये दोघंही रोमान्स करताना दिसत आहेत. तसेच कॅमेऱ्यासमोरच राखी आदिलला किस करताना दिसत आहे.

राखी-आदिलचा किसिंग व्हिडीओ व्हायरल

राखीने आदिलबरोबरचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ एका शूटदरम्यानचा आहे. यामध्ये दोघंही फोटोसाठी पोझ देताना दिसत आहेत. फोटोसाठी पोझ देताना राखी आदिलला किस करते. राखीने किस केल्यानंतर तो लाजत असल्याचं या व्हिडीओमध्ये दिसत आहे. या दोघांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे.

“तू फक्त माझा आहेस” असं राखीने हा व्हिडीओ शेअर करताना म्हटलं आहे. राखीने गुलाबी रंगाचा गाऊन तर आदिलने काळ्या रंगाचा कोट व त्याच रंगाची पँट परिधान केली असल्याचं या व्हिडीओमध्ये दिसत आहे. आदिल तुझाच आहे त्याला कोणी घेऊन नाही जाणार, बेस्ट कपल अशा अनेक कमेंट हा व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांनी केल्या आहेत.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rakhi sawant kiss her husband adil khan in front of camera video goes viral on social media see details kmd