छोट्या पडद्यावरील ‘बिग बॉस’ हा शो वादग्रस्त आणि तितकाच लोकप्रिय शो आहे. ‘बिग बॉस’चे यंदाचे हे १५ वे पर्व सुरु आहे. हा शो सुरु झाल्यापासून वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. आता बिग बॉसच्या १५ पर्वाचा अंतिम सोहळा रंगणार आहे. आता यंदाच्या पर्वाचा विजेता कोण असणार हे कळण्या आधी दरवर्षी प्रमाणे या वर्षीही अनेक सेलिब्रिटींचे डान्स परफॉर्मन्स आपल्याला पाहायला मिळणार आहेत. यात एक परफॉर्मन्स राखी सावंत आणि तिचा पती रितेशचा असणार आहे. पण त्या आधीच त्यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये लिपलॉक करताना दिसत आहेत.
राखी आणि रितेशचा हा व्हिडीओ सेलिब्रिटी फोटोग्राफर विरल भयानीने शेअर केला आहे. या व्हिडीओत फोटोग्राफर्स राखीला सांगतात की रितेशला किस कर. त्यानंतर राखी रितेशला किस करते. यावेळी राखी आणि रितेशने पिवळ्या रंगाचे कपडे परिधान केले आहेत. त्यांचा हा व्हिडीओ चर्चेचा विषय ठरला आहे.
आणखी वाचा : अक्षयचा पांढऱ्या दाढीतील फोटो शेअर करत ट्विंकल म्हणाली, “आपला माल तर…”
आणखी वाचा : इंटरनेट स्पीडवरून रितेशने जिनिलियाला मारला टोमणा, पाहा मजेशीर व्हिडीओ
दरम्यान, आज म्हणजे २९ आणि ३० जानेवारीला बिग बॉसचा अंतिम सोहळा प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. बिग बॉसच्या १५ व्या पर्वाचा विजेता कोण ठरणार? याकडे सर्वांचेच लक्ष लागले होते. सध्या बिग बॉसच्या घरात तेजस्वी प्रकाश, शमिता शेट्टी, करण कुंद्रा, रश्मी देसाई, प्रतीक सहजपाल आणि निशांत भट्ट हे स्पर्धक पाहायला मिळत आहे. आता विजेता कोण असणार याकडे सगळ्यांचे लक्ष आहे.