राखी सावंतच्या वैवाहिक आयुष्यात वादळ आलं आहे. आदिल आपल्याला मारहाण करत असल्याचं म्हणत राखीने त्याच्याविरोधात पोलिसांत तक्रार दिली. त्यानंतर आदिलला अटक करण्यात आली व १४ दिवसांसाठी त्याची रवानगी न्यायालयीन कोठडीमध्ये करण्यात आली आहे. आदिल कोठडीत गेल्यानंतरही राखी सातत्याने त्याच्यावर आरोप करत आहे.
गर्दीत बॅगेचा उल्लेख होताच बेशुद्ध राखी सावंतने उघडले डोळे, Video व्हायरल
राखीने आदिल खान दुर्रानीशी लग्न करण्यासाठी मुस्लीम धर्म स्वीकारला होता. तसेच तिने स्वतःचं नावही फातिमा ठेवलं होतं. तसेच धर्म बदलल्यानंतर आईला कळाल्यावर तिची प्रतिक्रिया काय होती? याबदद्ल आता राखीने खुलासा केला आहे. “माझ्या आईला जेव्हा मी आदिलशी लग्न केलंय, हे कळालं तेव्हा ती खूप रडली होती. तू धर्म का बदललास, याच्याशी का लग्न केलंस, असे प्रश्न तिने मला विचारले होते. मग माझं त्याच्यावर प्रेम असल्याचं मी तिला सांगितलं होतं. तसेच आदिलचंही माझ्यावर प्रेम असल्याचं सांगितलं होतं. तेव्हा आदिल माझ्या आईच्या पाया पडला होता. त्यानंतर माझी आई मला म्हणाली होती की तू आयुष्यात खूप दुःख सोसलंय, त्यामुळे आता खुश राहा. तिने आदिललाही मला त्रास न देण्याबदद्ल सांगितलं होतं,” असं राखीने सांगितलं.
दरम्यान, “आदिलने मला मारल्यानंतर मी आईच्या भेटीला गेले होते. तेव्हा आईने मारहाणीचे व्रण पाहून हे सगळं काय आहे, अशी विचारणा केली होती. मी आदिलने मारल्याचं सांगितल्यावर माझी आई खूप रडली होती. मला वडील असते तर कदाचित आदिलने ही हिंमत केली नसती. जरी माझ्याजवळ आई-वडील दोघेही नसले तरी देव आहे,” असं राखी सावंत रडत रडत म्हणाली.
राखी सावंतने आठ महिन्यांपूर्वी बॉयफ्रेंड आदिल खानशी लग्न केलं होतं. राखी बिग बॉस मराठीमध्ये गेल्यानंतर तिला आदिलच्या अफेअरबदद्ल कळालं आणि तिने आदिलबरोबरच्या लग्नाचा खुलासा केला. त्याआधी आदिलने तिला लग्न लपवून ठेवण्यास सांगितलं होतं, असा आरोपही तिने केला होता.