‘बिग बॉस’ फेम राखी सावंत नेहमीच काही ना काही कारणाने चर्चेत असते. मागच्या काही दिवसांपासून ती तिच्या नव्या बॉयफ्रेंडमुळे चर्चेत आहे. अलिकडेच एका इव्हेंटमध्ये तिने व्हिडीओ कॉलवरून आपल्या बॉयफ्रेंडची सर्वांशी ओळख करून दिली होती. त्यानंतर आता नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत राखीनं तिचं रिलेशनशिप आणि बॉयफ्रेंडबद्दल काही खुलासे केले आहेत. आपल्या नव्या नात्यावर राखीनं बिनधास्तपणे भाष्य केलं आहे.
राखी सावंत मागच्या काही काळापासून आदिल खान दुर्रानीला डेट करत आहे. आपल्या या नव्या रिलेशनशिपमुळे ती सोशल मीडियावर सातत्याने चर्चेत आहे. मागच्या वर्षी बिग बॉसच्या घरात तिने पती रितेशची सर्वांशी ओळख करून दिली होती. मात्र बिग बॉसमधून बाहेर पडल्यानंतर काही दिवसांतच राखीचा घटस्फोट झाल्याची माहिती समोर आली. पण यानंतर आता राखी पुन्हा एकदा प्रेमात पडली असून काही दिवसांपूर्वीच तिनं याची जाहिर कबुली दिली. नुकतंच ‘इ-टाइम्स’ला दिलेल्या मुलाखतीत राखीनं बॉयफ्रेंड आदिलबाबत काही खुलासे केले आहेत.
आणखी वाचा- जयेशभाई नाही ‘धर्मवीर’ जोरदार; बॉक्स ऑफिसवरील कमाई पाहिली का?
आदिल पेक्षा ६ वर्षांनी मोठी आहे राखी सावंत
राखी सावंतनं या मुलाखतीत सांगितलं की, रितेशपासून विभक्त झाल्यानंतर ती डिप्रेशनमध्ये गेली होती आणि त्याचवेळी आदिल तिच्या आयुष्यात आला. त्यानेच तिला यातून बाहेर पडण्यास मदत केली. राखी म्हणाली, “आमची ओळख झाल्यावर एका महिन्यानंतर आदिलनं मला प्रपोज केलं. मी त्याच्यापेक्षा ६ वर्षांनी मोठी आहे. मी सुरुवातीला या नात्यासाठी अजिबात तयार नव्हते. पण त्याने मला समजावलं. आदिलनं मला मलायका- अर्जुन, प्रियांका- निक यांचं उदाहरण दिलं. तो माझ्यावर खूप प्रेम करतो आणि मग मी देखील त्याच्या प्रेमात पडले.”
आदिलच्या कुटुंबीयांचा नात्याला विरोध
राखी सावंतनं या मुलाखतीत आदिलच्या कुटुंबीयांबाबतही भाष्य केलं. ती म्हणाली, “मी मनोरंजन क्षेत्रात काम करते. इथे मला नेहमीच ग्लॅमरस अवतारात दाखवण्यात आलं आहे. माझी जी प्रतिमा या क्षेत्रात आहे. आदिलचे कुटुंबीय त्याच्या विरोधात आहेत. जेव्हा त्यांना आमच्या नात्याबद्दल समजलं होतं तेव्हा तिथे बराच वाद झाला. माझी कपडे परिधान करण्याची पद्धतही त्यांना आवडत नाही. अर्थात या गोष्टी बदलण्यासाठी मी तयार आहे.”
आणखी वाचा- जयेशभाई नाही ‘धर्मवीर’ जोरदार; बॉक्स ऑफिसवरील कमाई पाहिली का?
दरम्यान राखी सावंतचा बॉयफ्रेंड आदिल हा मुळचा मैसूरचा आहे. आदिलचा बहीण शैली ही राखी सावंतची चांगली मैत्रीण आहे. तिच्याच माध्यमातून राखी आणि आदिलची ओळख झाली होती. आदिल हा एक बिझनेसमन असून काही दिवसांपूर्वीच त्यानं राखीला बीएमडब्ल्यू कार गिफ्ट केली होती. ज्याची बरीच चर्चा झाली होती.