बॉलिवूडमध्ये सर्वाधिक चर्चेत असलेल्या जोड्यांपैकी एक जोडी म्हणून रणबीर कपूर आणि आलिया भट्टला ओळखले जाते. लवकरच ही जोडी विवाहबंधनात अडकणार आहे. रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांच्या लग्नाच्या चर्चांना गेल्या काही दिवसांपासून उधाण आलं आहे. येत्या १७ एप्रिलला ते दोघेही विवाहबंधनात अडकणार असल्याचे बोललं जात आहे. मात्र अद्याप याबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. नुकतंच आलिया आणि रणबीरच्या लग्नावर अभिनेत्री राखी सावंतने प्रतिक्रिया दिली आहे.

आलिया भट्ट आणि रणबीर कपूर या दोघांचे लग्न मुंबईत पार पडणार आहे. या लग्नासाठी त्यांनी कोणतंही फाइव्ह स्टार हॉटेल बुक करण्यात आलेले नाही. रणबीर कपूर आणि आलिया भट्ट मुंबईतील कोणत्याही फाइव्ह स्टार हॉटेलमध्ये नाही तर कपूर कुटुंबियांच्या प्रसिद्ध ‘आरके हाऊस’मध्ये सप्तपदी घेणार आहेत. या लग्नाच्या विविध सोहळ्यांना १३ एप्रिलला सुरुवात होणार असून १७ एप्रिलला ते दोघेही सप्तपदी घेणार आहेत, असे बोललं जात आहे.

अभिनेत्री आएशा टाकिया आणि पतीसोबत गोवा विमानतळावर गैरवर्तन, वाचा नेमकं काय घडलं?

गेल्या काही दिवसांपासून आलिया आणि रणबीरच्या लग्नाच्या चर्चा सुरु आहेत. नुकतंच एका कार्यक्रमादरम्यान राखी सावंतला त्यांच्या लग्नाबद्दल विचारणा करण्यात आली. त्यावेळी राखी सावंतने मी आलिया आणि रणबीरच्या लग्नाची बातमी ऐकून फारच खूश असल्याचे सांगितले आहे.

“आलियासाठी यंदाचे वर्ष फारच चांगले आहे. तिचा गंगूबाई काठियावाडी आणि आरआरआर हे दोन्हीही चित्रपट सुपरहिट ठरले. त्यानंतर आता ती विवाहबंधनात अडकणार आहे. त्यानंतर ती हॉलिवूड चित्रपट करणार आहे, अशीही चर्चा आहे. त्यामुळे मी तर ठरवलं आहे की मी हुंडा म्हणून तिच्यासोबत जाणार आहे. हवंतर तिच्या बॅगेत बसून जाईन”, असे राखी सावंत म्हणाली.

“मला ते आवडणार नाही…”, आलिया भट्ट आणि रणबीर कपूरच्या लग्नावर शाहिद कपूरची प्रतिक्रिया

दरम्यान, रणबीर आणि आलिया आरके हाऊसमध्ये लग्नाच्या बेडीत अडकणार आहेत. तर १३ एप्रिल पासून लग्नाच्या कार्यक्रमांना सुरुवात होण्याची शक्यता आहे. रणबीर आणि आलिया यांच्या लग्नात त्यांचे काही जवळचे मित्र आणि कुटुंबातील काही सदस्य हजेरी लावणार आहेत. रणबीरची इच्छा आहे की त्याने अनेक वर्षे काम केलेल्या टेक्निशियने देखील त्याच्या लग्नात हजेरी लावावी. त्याच्या लग्नात बेस्ट फ्रेंड अयान मुखर्जी, करण जोहर, आदित्य रॉय कपूर हे उपस्थित असणार आहेत.

Story img Loader