अभिनेत्री आणि ‘ड्रामा क्वीन’ राखी सावंत ‘बिग बॉस’ या रिऍलिटी शोमुळे चांगलीच चर्चेत आली होती. सोशल मीडियावरही ती सक्रिय असते. तिने बऱ्याचदा आपल्या पतीचा उल्लेख केला असला तरी त्याच्याबद्दल कुणाला फारशी माहिती नाही. त्यामुळे तिचा नवरा कोण आहे, हे एक रहस्य आहे. पण लवकरच हे रहस्य उलगडणार असल्याचं दिसून येत आहे. राखी सावंत यापूर्वी ‘बिग बॉस’ १४’मध्ये चॅलेंजर स्पर्धक म्हणून पुन्हा एकदा झळकली होती. या शोच्या दरम्यान तिचा पती रितेश, ज्याची ओळख अद्याप कळली नाही, तो चर्चेचा विषय ठरला होता. त्याच्या नावाची चर्चा एवढी झाली की सगळ्या लोकांना रितेश कोण आहे? असा प्रश्न पडला आहे. त्याला कसं भेटता येईल या प्रश्नाचे उत्तर राखीने एका मुलाखतीत दिले आहे.
‘एका मुलाखतीत राखीने बिग बॉस’च्या निर्मात्यांना विनंती करत म्हणाली की, “माझ्या पतीला खूप इगो आहे, रितेशला तुम्ही कॅनडावरून बोलवा आणि शो मध्ये माझ्या बरोबर सहभागी व्हायला सांगा. सलमान (खान) सर आणि बिग बॉस हे दोघेच त्याचा माज उतरवू शकतील . बिग बॉसच्या घरात राहिल्यावर बऱ्याच लोकांची डोकी ठिकाणावर आली आहेत, असेही राखी सावंतने त्या मुलाखतीत सांगितले आहे.
View this post on Instagram
राखीचा पती रितेशने आपली ओळख सांगितली नसली तरी तो ‘बिग बॉस’मध्ये नक्कीच सहभागी होईल, असं राखी या मुलाखतीत सांगताना दिसली. ती म्हणाली की, “पैसे फेका आणि तमाशा बघा, या इंडस्ट्रीमध्ये सगळे पैश्यासाठी काम करतात आणि जर ‘बिग बॉस’च्या निर्मात्यांनी चांगलीच ऑफर दिली तर रितेश का नकार देईल.”
कलर्स वाहिनीवरील लोकप्रिय शो बॉस’चा १५ वा सीजन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. या सीजनची चर्चा जोरदार सुरू आहे. कारण या वेळेस बिग बॉस आपले माध्यम बदलणार आहे. यंदा ‘बिस बॉस १५’ ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज करण्यात येणार असून नंतर तो टीव्हीवर प्रदर्शित होईल. या शोच्या ओटीटी व्हर्जनचे सूत्रसंचालन करण जोहर करणार असून नंतर ही जबाबदारी सलमान खान सांभाळताना दिसेल. ‘बिग बॉस’ ओटीटी व्हर्जन येत्या ‘८ ऑगस्ट’रोजी प्रदर्शित होणार आहे.