अभिनेत्री राखी सावंत ही बिग बॉसमुळे प्रकाशझोतात आली. या कार्यक्रमातून तिला भरपूर लोकप्रियता मिळाली. बिग बॉसचे अनेक सिझन्स तिने गाजवले. बिग बॉसच्या घरात ती जितकी चर्चेत असते तेवढीच चर्चा तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दही होत असते. राखी सावंत सध्या बिझनेसमन आदिल दुर्रानीसोबत रिलेशनशिपमध्ये असून त्यांचे चाहते आता या जोडप्याच्या लग्नाची आतुरतेने वाट पाहत आहेत. ते अनेकदा एकत्र दिसतात. नुकतेच ते पुन्हा एकदा एकत्र फिरताना दिसले. पण यावेळी राखीने तिच्या बोलण्याने सगळ्यांनाच आश्चर्यचाकीत करून सोडले आहे. तिने आदिलबद्दल एक मोठा खुलासा केला आहे.

आणखी वाचा : “मेरा नाम विजय साळगांवकर और ये मेरा कन्फेशन…”, ‘दृश्यम 2’ चा उत्कंठावर्धक टीझर प्रदर्शित

D Gukesh Raj Thackeray
Raj Thackeray : जगज्जेता डी गुकेशसाठी राज ठाकरेंची खास पोस्ट; म्हणाले, “बुद्धिबळाचा हा खेळ…”
nana patekar reacts on allu arjun arrest
अल्लू अर्जुनच्या अटक प्रकरणावर नाना पाटेकर म्हणाले, “कोणाला…
rashmika mandanna salman khan
“मी आजारी आहे समजल्यावर…” रश्मिका मंदानाने सांगितला सलमान खानबरोबर काम करतानाचा ‘तो’ किस्सा, म्हणाली, “स्वप्न…”
sridevi akshay kumar
“अक्षय कुमारवर श्रीदेवी चिडल्या होत्या…”, प्रसिद्ध दिग्दर्शकाने सांगितला किस्सा; म्हणाला, “तो घाबरायचा…”
Shabana Azmi Javed Akhtar
शबाना आझमींना चेटकिणीच्या रुपात पाहून जावेद अख्तर यांनी दिलेली ‘अशी’ प्रतिक्रिया, म्हणालेले, “सगळा मेकअप…”
rekha lata mangeshkar
“देवा पुढल्या जन्मी…”, रेखा यांनी सांगितला लता मंगेशकरांबद्दलचा ‘तो’ किस्सा; म्हणाल्या, “मला त्यांनी…”
Gashmeer Mahajani
“दिवसभर मद्यप्राशन करायचो, स्वत:ला सहा महिने कोंडून घेतलं…”, नैराश्यात गेलेला गश्मीर महाजनी, सांगितला ‘तो’ कठीण काळ
when Amol Palekar slapped Smita Patil without her consent
“मी तिला झापड मारली”, अमोल पालेकरांनी सांगितला स्मिता पाटील यांना न सांगता केलेल्या सीनचा प्रसंग; म्हणाले “ती संतापली होती”

राखी सावंत जेव्हाही आदिलबरोबर दिसते तेव्हा ती मस्तीच्या मूडमध्ये असते. असेच काहीसे यावेळीही पाहायला मिळाले. राखी आणि आदिल नुकतेच एकत्र दिसले. त्या दरम्यान राखी आदिलबद्दल असे काही बोलली ज्यामुळे चाहत्यांना त्यांचे हसू आवरता आले नाही. नुकताच तिचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

यात राखी सावंत तिच्यासोबत आलेल्या एका व्यक्तीची मीडियाच्या लोकांशी ओळख करून देते आणि म्हणते, “हे भाऊ आहेत.” इतक्यात आदिल तिथे येतो आणि त्याच्याकडे बघून ती म्हणते, “हे कसाई आहेत. हे मला रोज मारतात.” याच्या पुढे आदिलही गमतीने म्हणतो, “आणि ती आम्हा दोघांना मटण देते.” राखी आणि आदिलचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

हेही वाचा : राखी सावंतला दुसऱ्याबरोबर रोमान्स करताना पाहून भडकला आदिल खान, प्रकरण गेले मारामारीपर्यंत

राखी आणि आदिल दीर्घकाळापासून एकमेकांना डेट करत आहेत आणि त्यांच्या चाहत्यांनाही ही जोडी खूप आवडते. राखी आणि आदिल दोघेही त्यांच्या चाहत्यांबरोबर त्यांचे अनेक गमतीदार व्हिडिओ शेअर करत असतात. यासोबतच राखी आणि आदिल एकमेकांबरोबर वरचेवर फोटोशूटही करत असतात, ज्यामध्ये त्यांची जबरदस्त केमिस्ट्री पाहायला मिळते.

Story img Loader