बॉलिवूडची ड्रामा क्वीन अभिनेत्री राखी सावंत ही कोणत्या ना कोणत्या कारणामुळे सोशल मीडियावर चर्चेत असते. राखी तिच्या पतीमुळे गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत होती. रितेश असे राखीच्या पतीचे नाव आहे. तिच्या पतीला अजून कोणी पाहिले नाही म्हणून तिचं लग्न झालं नाही अशी चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून सुरु होती.

एका मुलाखतीत राखीने यावर वक्तव्य केलं आहे. “मी माझ्या आयुष्यात बरेच निर्णय विचार न करता पटकन घेतले आहेत. जर हे लग्न टिकलं नाही. तर मी पुन्हा लग्न करणार नाही आणि मी सांगु इच्छिते की रितेशने माझ्या आईवर आणि माझ्यासाठी खूप खर्च केला आणि त्याने मला मुंबईत फ्लॅट घेऊन देण्याचे वचन दिले आहे, असे राखी म्हणाली.

पुढे राखी म्हणाली, “परंतु रितेशने मला सांगितले की त्याला माझ्यासोबत राहायचे आहे. मात्र, अशा कठीण प्रसंगामुळे तो इथे येऊ शकला नाही. मी वाट बघतं आहे. मी येशू ख्रिस्तावर पूर्ण विश्वास ठेवते आणि मी खोटं लग्न केलेलं नाही. त्याला मी खोटी वचन दिलेली नाही. मी त्याला इतर कोणत्याही स्त्रीसोबत वाटू शकतं नाही. माझ्याशी लग्न करण्यााधी त्याचे लग्न झालेले आहे. तो एक वडील देखील आहे. मी त्याच्यावर निर्णय सोडला आहे.”

आणखी वाचा : ‘यांचा रुपयाही घेऊ नका’, अमिताभ यांना २ कोटी परत देण्याची परमिंदर सिंग यांची मागणी

रितेशचे नाव गेल्या अनेक दिवसांपासून ऐकायला मिळतं आहे. ‘बिग बॉस १४’ मध्ये राखीने बऱ्याच वेळा रितेशचे नाव घेतले. एवढंच नाही तर ती रितेशला दोन वर्ष भेटली नाही असे देखील राखीने सांगितले होते.

Story img Loader