गेल्या वर्ष भरापासून करोनाचे काळे ढग जायचं नाव घेत नाहीत. त्यात गेल्या वर्षीपासून अनेक बॉलिवूड कलाकार गरजूंना मदत करत आहेत. फक्त बॉलिवूड अभिनेता सोनू सूद नाही तर बॉलिवूडचा भाईजान अभिनेता सलमान खान देखील गरजूंच्या मदतीला लगेच धावून येतो. आता एका मुलाखतीत बॉलिवूडची ड्रामा क्वीन अभिनेत्री राखी सावंतने सोनू सूद किंवा सलमान खानला पंतप्रधान बनवले पाहिजे असे म्हटले आहे.

राखीच्या आधी अभिनेता वीर दासने सोनू सूदला पंतप्रधान बनवले पाहिजे असे म्हटले होते. राखीने नुकतीच ‘ईटाइम्स’ला मुलाखत दिली. या मुलाखतीत राखीने हे वक्तव्य केलं आहे. त्याचा व्हिडीओ देखील ईटाइम्सने त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर केला आहे. “मी बोलते की सोनू सूद आणि सलमान खान यांच्या पैकी कोणी पंतप्रधान झालं पाहिजे, कारण ते खरे हीरो आहेत. सोनू सूद, सलमान खान, अक्षय कुमार आणि अमिताभ बच्चन आपल्या देशातील नागरिकांना किती प्रेम आणि मदत करत आहेत,” असे राखी म्हणाली. राखीचा हा व्हिडीओ प्रचंड व्हायरल झाला आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by ETimes TV (@etimes_tv)

या आधी राखीचा मदर्सडेचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला होता. या व्हिडीओमध्ये राखीने तिच्या आईला साडी भेट म्हणून दिल्याचे दिसते. या व्हिडीओत राखी म्हणाली की, “तुमच्या आईला ऑनलाइन नाही तर ऑफलाइन शुभेच्छा आणि भेट द्या.”

आणखी वाचा : Corona Crisis: मी काय केलं? ऐकाच! अमिताभ बच्चन यांनी टीकाकारांना दिला खणखणीत जवाब

राखी सावंत तिच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे नेहमीच चर्चेत असते. तिची लाखो चाहते आहेत. मात्र, या आधी राखी तिच्या पतीमुळे चर्चेत होती. रितेश असे राखीच्या पतीचे नाव आहे. तिच्या पतीला अजून कोणी पाहिले नाही. त्यामुळे ती खोटं बोलत असल्याचे आरोप अनेकांनी तिच्यावर केले होते.

Story img Loader