ड्रामा क्वीन राखी सावंत तिच्या वैवाहीक आयुष्यामुळे नेहमीच चर्चेत असते. बिग बॉसच्या १५ व्या पर्वात राखी सावंतचा पती रितेश पहिल्यांदाच सर्वांसमोर आला. त्यानंतरही राखी सावंतचं लग्न सोशल मीडियावर सतत्यानं चर्चेचा विषय ठरताना दिसत आहे. बिग बॉसच्या घरात असताना राखी सावंत नेहमीच तिचं लग्न पुढे टिकणार की नाही याचा विचार करताना दिसायची. पण आता नुकतंच तिनं तिच्या लग्नाबद्दल धक्कादायक वक्तव्य केलं आहे.
‘इ-टाइम्स’ला दिलेल्या मुलाखतीत राखी सावंतनं तिचं लग्न आणि पतीसोबतचं नातं यावर भाष्य केलं. तिला जेव्हा रितेशसोबतचं आत्ताचं नातं काय आहे असा प्रश्न विचारण्यात आला त्यावर तिनं जे वक्तव्य केलं त्यामुळे सर्वांनाच धक्का बसला. पती रितेशसोबतच्या नात्याबद्दल बोलताना राखी म्हणाली, ‘आम्ही सध्या तरी एकमेकांचे चांगले मित्र आहोत. त्यामुळे काही सांगता येणार नाही.’
राखी सावंत आणि रितेशनं जेव्हा बिग बॉस १५ मध्ये एंट्री केली होती. तेव्हा तिनं रितेश आपला पती असल्याचं सांगितलं होतं. पण जेव्हा या मुलाखतीत तिला जेव्हा, ‘रितेश आणि तू आता पती- पत्नी आहात ना?’ असा प्रश्न विचारला तेव्हा ती म्हणाली, ‘मी सध्या यावर काहीच बोलू शकत नाही. बिग बॉसच्या घरातून बाहेर निघाल्यानंतर मी आणि रितेश एकमेकांचे चांगले मित्र आहोत. पती- पत्नी नाही. काही कायदेशीर प्रक्रिया बाकी आहेत. रितेश सध्या त्या सर्व पूर्ण करत आहे. बिग बॉसच्या घरात असताना सर्वांनी माझा पती भाड्याच्या असल्याचं म्हटलं होतं. तर मग ठीक आहे. त्यात काही मोठी गोष्ट नाही. पुढे सर्व गोष्टी चांगल्याच होतील.’
राखी सावंतच्या या वक्तव्यांमुळे सर्वांनाच धक्का बसला आहे. जेव्हा बिग बॉसच्या घरात राखीनं रितेशची पती म्हणून ओळख करून दिली होती. तेव्हा रितेश अगोदरच विवाहित असल्याची माहिती समोर आली होती. ज्यामुळे अनेकांनी राखीला ट्रोल केलं होतं. रितेशनं अद्याप आपल्या पत्नीला घटस्फोट दिलेला नाही. त्यामुळे राखी आणि त्याच्या लग्नाला कायदेशीर मान्यता मिळालेली नाही.