ड्रामा क्वीन राखी सावंतचं खासगी आयुष्य नेहमीच चर्चेत राहिलं आहे. ‘बिग बॉस मराठी’च्या घरातून बाहेर आल्यानंतर तिला आई रुग्णालयात असल्याचं तिला समजलं. राखीची आई ब्रेन ट्युमरने त्रस्त आहे. सध्या रुग्णालयात तिच्यावर उपचार सुरू आहेत. अशामध्येच राखीने बॉयफ्रेंड आदिल खानशी लग्न केलं असल्याचं सोशल मीडियाद्वारे जाहिर केलं. पण लग्न करण्यामागचं सत्य नेमकं काय? याबाबत राखीने खुलासा केला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आणखी वाचा – Video : उर्फी जावेदचं ‘ते’ कृत्य पाहून तुमचाही होईल संताप, विमानतळावरच केलं असं काही की…

राखी सावंतने इन्स्टाग्रामवर लग्नाचे काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये आदिल व राखीच्या गळ्यात वरमाळा तसेच हातात मॅरेज सर्टिफिकेट आहे. या मॅरेज सर्टिफिकेटवर लग्नाची तारीख २९ मे २०२२ अशी आहे. पण लग्न लपवून का ठेवलं? आणि या लग्नामागचं सत्य नेमकं काय हे राखीने सांगितलं आहे.

राखी सावंतचा लग्नाबाबत खुलासा

‘टाइम्स नाऊ’ला दिलेल्या मुलाखतीमध्ये राखी म्हणाली, “मी ‘बिग बॉस मराठी’च्या घरामधून बाहेर आल्यानंतर सगळ्या़ गोष्टी मला बदललेल्या दिसल्या. माझ्या क्षमतेपलिकडे या सगळ्या गोष्टी गेल्या होत्या. म्हणूनच मी सोशल मीडियावर माझ्या लग्नाचे फोटो शेअर केले. मी घाबरले होते. तो माझ्यावर खूप प्रेम करतो. पण लग्नाला नकार का देतो? नक्कीच त्याच्यावर त्याच्या कुटुंबियांचा दबाव असणार.”

पुढे राखी म्हणाली, “माझी आई रुग्णालयामध्ये भरती आहे. ती ब्रेन ट्युमरमुळे त्रस्त आहे. मी खूपच त्रस्त आहे. पण आदिल माझ्याशी बोलतही नाही. तो माझ्याशी का बोलत नाही? हे तुम्ही त्यालाच विचारु शकता. माझ्याबरोबरच अशा वाईट गोष्टी का घडतात? मलाही ठाऊक नाही.” राखीच्या लग्नाबाबतच सध्या सगळीकडे जोरदार चर्चा सुरू आहे.