बॉलिवूडची ड्रामा क्वीन राखी सावंत कोणत्या ना कोणत्या कारणामुळे सतत चर्चेत असते. जेव्हा पासून राखीने सर्जरी केल्याचे सांगितले आहे तेव्हा पासून तिला लोकांनी ट्रोल केले आहे. कोणी तिला प्लास्टिक म्हणाल तर कोणी काय. राखीला वाईट वाटते की जगात अनेक लोक प्लास्टिक सर्जरी करतात. मात्र, तिलाच सगळे प्लास्टिक बोलतात.
राखीने नुकतीच ‘बॉलिवूड बबल’ला एक मुलाखत दिली. या मुलाखतीत राखीने प्लास्टिक सर्जरी विषयी सांगितले आहे. “सत्य बोलणं माझ्यासाठी गुन्हा ठरला आहे. जेव्हा मी हे सत्य सगळ्यांना सांगितलं त्या दिवसापासून लोक मला प्लास्टिक म्हणत आहेत. मी प्लास्टिक नाही, टिश्यू पेपर नाही. त्यावेळी माझ्या काय समस्या होत्या हे त्यांना माहित नाही. मी लहान होती. माझी बॉडी नव्हती. मी घर सोडून पळून आली होती,” असे राखी म्हणाली.
View this post on Instagram
राखी पुढे म्हणाली, “मी काहीही केले नसते तर माझे आई-वडील मला ओढून घेऊन गेले असते. कुठेतरी माझं लग्न झालं असतं आणि मग काय झालं असतं मला माहित नाही. लहान वयातच मी माझ्या शरीरावर काही आर्टिफिशल गोष्टी करायचं ठरवलं होतं. मी त्या वेदनेचा अनुभव घेतला होता. एखाद्याच्या शरीरात हार्ट इम्प्लांट होतं, तर कोणच्या शरीरात मूत्रपिंड. मला आता हे परत करायचं नाही.”
२००७ मध्ये दिग्दर्शक करण जोहरचा टॉक शो ‘कॉफी विथ करण’मध्ये राखीने हजेरी लावली होती. यात राखी तिच्या प्लास्टिक सर्जरी विषयी बोलताना म्हणाली, “जे देव देत नाही ते डॉक्टर देतात.”
आणखी वाचा : ..मग मुस्लीम व्यक्तीशी लग्न करतानाच असं का?; आमिर-किरण रावच्या घटस्फोटावर कंगनाचा सवाल
आणखी वाचा : रॉबर्ट डाउनी ज्युनिअरनं माझ्या मेसेजची दखलही घेतली नाही – तापसी पन्नूची खंत
प्लास्टिक सर्जरीवरून ट्रोल होण्यावर राखी म्हणाली, “मिस वर्ल्ड, मिस यूनिव्हर्स होण्यासाठी मुली बऱ्याच सर्जरी करतात, मात्र लोक मलाच दोष का देतात? आजकाल महिला त्यांच्या नवऱ्याचं लक्ष वेधून घेण्यासाठी प्लास्टिक सर्जरी करतात. सेलिब्रिटी सुंदर दिसण्यासाठी प्लास्टिक सर्जरी करतात. मात्र मलाच सर्वजण फक्त प्लास्टिक का म्हणतात?”