बोल्ड आणि बिनधास्त अवतारासाठी ओळखली जाणारी राखी सावंत आता ‘जयजयकार’ या मराठी चित्रपटाची निर्मिती करीत आहे. ‘फेथ इन्कॉर्पोरेट मूव्हीज प्रायव्हेट लिमिटेड’ या संस्थेतर्फे राखीने या चित्रपटाची निर्मिती केली आहे. 
‘जयजयकार’चे लेखक-दिग्दर्शक शंतनु रोडे यांनी अलीकडेच एका पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. राखी प्रथमपासूनच या चित्रपटाच्या निर्मितीमध्ये गुंतली होती. पण ती लोकसभा निवडणुकीतील तिच्या उमेदवारीमुळे याबाबत गुप्तता पाळण्यात आली होती, असे ते म्हणाले. राखीला स्वत:ला सामाजिक क्षेत्राविषयी बांधिलकी आहे आणि समाजासाठी काम करण्यासाठी ती नेहमीच उत्सुक असते. या चित्रपटाचा विषयही सामाजिक असल्यामुळे तिने या चित्रपटाची निर्मिती करण्याचे ठरवले, असे ते म्हणाले.

Story img Loader