बॉलिवूडची ड्रामा क्वीन अभिनेत्री राखी सावंत ही लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. राखी सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसते. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत राखी चाहत्यांच्या संपर्कात राहते. नुकताच राखीने एक व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.
राखीने हा व्हिडीओ तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केला आहे. या व्हिडीओत राखीने गुलाबी रंगाचं टी-शर्ट आणि शॉर्ट्स परिधान केली आहे. त्यानंतर अंगावर तिने भांडी लावली आहेत. राखी सगळ्यांना एका वेगळ्या अंदाजात बेले डान्स करायचा शिकवते. हा व्हिडीओ शेअर करत बेलेडान्सचा नवा ट्रेंड फक्त आणि फक्त राखीसोबत, असे कॅप्शन दिले आहे. यासोबत तिने अनेकांना चॅलेन्जही केले आहे. राखीचा हा डान्स पाहून अनेक नेटकऱ्यांनी कमेंट करत हे काय आहे, असा प्रश्न केला आहे.
आणखी वाचा : एकाच वेळी फणा काढलेल्या तीन सापांसोबत खेळत होता हा मुलगा आणि…; बघा Viral Video
आणखी वाचा : ‘कालचा एपिसोड बघून वाईट वाटलं ना…’, परी आणि मामीचा भन्नाट श्रीवल्ली डान्स पाहिलात का?
दरम्यान, राखीचा आधी दाक्षिणात्य अभिनेता अल्लू अर्जुनच्या ‘पुष्पा’ चित्रपटातील सामी सामी गाण्यावरचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. राखीने एका वेगळ्या अंदाजात सामी सामी गाण्याची हूक स्टेप केली होती. दरम्यान, ‘पुष्पा’ चित्रपटातील सामी सामी गाण्यावर अभिनेत्री रश्मिका मंदानाने डान्स केला होता.