बिनधास्त आणि वादग्रस्त विधानांमुळे चंदेरी दुनियेत चर्चेत राहण्याची सवय झालेल्या राखी सावंतच्या मैत्रिणीने शुक्रवारी मुंबईत ‘कास्टिंग काऊच’चा आरोप करत एका दिग्दर्शकाच्या श्रीमुखात भडकावली.
त्याचे झाले असे की, ‘मुंबई कॅन डान्स साला’ या आगामी चित्रपटाचा मुंबईत संगीत प्रकाशनाचा कार्यकम सुरू होता. या चित्रपटात भुमिका साकारत असल्यामुळे राखी सावंत देखील कार्यक्रमाला उपस्थित होती दरम्यान, राखीची मैत्रिण मनिषा कुमारी हीने अचानक कार्यक्रमात मंचावर जाऊन दिग्दर्शक सचिंद्र शर्मा यांना जोरदार थप्पड लगावली आणि सर्व स्तब्ध झाले.
चित्रपटामध्ये काम देण्यासाठी सचिंद्र शर्मा यांनी कॉम्प्रोमाईज करण्यासाठी दबाव टाकल्याचा आरोप मनिषा कुमारीने केला आहे. तसेच राखीनेही मैत्रिणीची बाजू घेऊन मनिषाने केलेले आरोपांमध्ये तथ्य असल्याचे म्हटले. तर, दिग्दर्शक सचिंद्र शर्मा यांनी सर्व आरोप फेटाळून लावत हा केवळ पब्लिसिटी स्टंट असल्याचे म्हटले आहे. सिनेसृष्टीत प्रसिद्धी मिळविण्यासाठी अशाप्रकारचे स्टंट्स काही अभिनेत्री करत असतात. मी त्या मुलीला ओळखत देखील नाही, असे सचिंद्र शर्मा यांनी सांगितले.
‘मुंबई कॅन डान्स साला’ या चित्रपटात राखीसोबत अशिमा शर्मा, प्रशांत नारायण, आदित्य पांचोली आणि शक्ती कपूर यांच्याही भूमिका असून हा चित्रपट पुढील महिन्यात प्रदर्शित होण्याची शक्यता आहे.

Story img Loader