बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारचा बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षीत चित्रपट ‘रक्षाबंधन’चा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. हा चित्रपट ११ ऑगस्ट रोजी प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात रिलेशनशिपमध्ये अडकलेल्या अक्षयची संपूर्ण कहाणी दाखवण्यात आली आहे. ट्रेलरमध्ये प्रेमाचे अनेक रंग पाहायला मिळत आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आणखी वाचा : International Yoga Day : करीनाचा लेक जेहने असा केला योगा दिवस साजरा

अक्षय कुमारने नुकतंच ‘रक्षाबंधन’चं पोस्टर शेअर केलं होतं आणि आता लगेच चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला आहे. ट्रेलरमध्ये भावा-बहिणीमध्ये असलेलं प्रेम आणि त्यांच अतूट बंधनाची कथा दाखवण्यात येणार आहे. या चित्रपटात अक्षयच्या गर्लफ्रेंडची भूमिका भूमी पेडणेकर साकारत आहे. ट्रेलरमध्ये अक्षय त्याच्या गर्लफ्रेंडशी म्हणजेच भूमीशी बहिणींमुळे वाद घालताना दिसत आहे. आधी आपल्या चार बहिणींचे लग्न व्हावे आणि नंतर तो लग्न करणार असं अक्षय बोलतो. पण या सगळ्यात अक्षय भूमीला गमावू शकतो असे चित्र दिसत आहे.

आणखी वाचा : “मी महाराष्ट्रीय असल्याचा मला खूप अभिमान आहे”; वरुण धवनचे वक्तव्य चर्चेत

आणखी वाचा : ब्रह्मास्त्र: रणबीर कपूरने मंदिरात बूट का घातले? दिग्दर्शक अयान मुखर्जीने दिले स्पष्टीकरण

आनंद एल राय दिग्दर्शित ‘रक्षाबंधन’ या चित्रपटात अक्षय कुमार आणि भूमी पेडणेकर मुख्य भूमिकेत आहेत. चित्रपटाच्या शीर्षकानुसार आणि अक्षयच्या वर्णनानुसार, ‘रक्षाबंधन’ हा चित्रपट भाऊ आणि बहिणीच्या पवित्र नात्यावर आधारित आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rakshabandhan trailer akshay kumar bhumi pednekar movie trailer released dcp