बॉलिवूड अभिनेत्री रकुल प्रीत सिंह ही लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. आज रकुलचा वाढदिवस आहे. रकुलला तिच्या चाहत्यांपासून सेलिब्रिटींपर्यंत सगळ्यांनीच वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. दरम्यान, आज वाढदिवसाच्या निमित्ताने रकुलने तिच्या रिलेशनशिपविषयी एक मोठी घोषणा केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

रकुलने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून एक फोटो शेअर केला आहे. हा फोटो शेअर करत रकुलने तिच्या रिलेशनशिपविषयी खुलासा केला आहे. रकुलने जॅकी भगनानीसोबतचा हा फोटो शेअर केला आहे. “माय लव्ह! या वर्षी भेटलीली सर्वात चांगली भेट तू आहेस! माझ्या आयुष्यात रंग भरल्याबद्दल धन्यवाद, मला नेहमी हसवल्याबद्दल धन्यवाद,” अशा आशयाचे कॅप्शन रकुलने दिले आहे.

आणखी वाचा : “जेव्हा माझ्या ११ वर्षाच्या मुलाचे निधन झाले तेव्हा शाहरूख…”, शेखर सुमनचे ट्वीट व्हायरल

आणखी वाचा : बिग बींनी जलसाजवळील जागा SBI ला दिली भाडेतत्वावर, भाडं ऐकून येईल चक्कर

रकुलच्या या पोस्टवर अनेक सेलिब्रिटींनी कमेंट करत सेलिब्रिटींनी शुभेच्छा दिल्या आहेत. लवकरच रकुल अमिताभ बच्चन आणि अजय देवगणसोबत ‘मेडे’ या चित्रपटात दिसणार आहे. याशिवाय अर्जून कपूरसोबत ‘सरदार का ग्रँडसन’ या चित्रपटात ती झळकली.