‘रॉकस्टार’ चित्रपटाचे दिग्दर्शक इमतियाझ अली आणि ‘भाग मिल्खा भाग’ चित्रपटाचे दिग्दर्शक राकेश ओमप्रकाश मेहरा धनुषच्या अभिनयाने प्रभावित झाले आसून, धनुषबरोबर काम करण्याची इच्छा अल्याचे मत त्यांनी व्यक्त केले आहे. ‘मारयन’ चित्रपटातील धनुषचा अभिनय पाहिल्यावर दोन्ही दिग्दर्शकांनी या तमिळ सुपरस्टारवर स्तुतीसुमनांचा वर्षाव केला आहे. ‘रांझना’ चित्रपटाद्वारे धनुषने बॉलिवूडमध्ये यशस्वी पदार्पण केले आहे.
धनुषने दोन्ही दिग्दर्शकांचे आभार मानले आहेत –
My sincere thanks to imtiaz Ali sir and rakesh mehra sir for such kind words about my performance in mariyaan. Feel super encouraged 🙂
— Dhanush (@dhanushkraja) August 12, 2013
‘राझना’नंतर ‘मारयन’ हा धनुषचा पहिला चित्रपट प्रदर्शित होत आहे. या चित्रपटाची प्रेमकथा एका सत्यकथेवर आधारीत असून, यात मानवाचा जगण्यासाठीचा संघर्ष दाखविला आहे. या चित्रपटात धनुषने प्रमुख भूमिका साकारली आहे. राष्ट्रिय पारितोषिक विजेत्या धनुषने या चित्रपटात एका कोळ्याची व्यक्तिरेखा साकरली आहे. ऑस्कर पारितोषिक विजेत्या ए. आर. रहमानने चित्रपटाला दिलेले संगीत खुप लोकप्रिय झाले आहे.