Anant Ambani-Radhika Merchant Wedding: देशभरात नव्हे तर जगभरातील बहुचर्चित अशा अनंत अंबानी व राधिका मर्चंट यांच्या लग्नसोहळ्याला अवघे काही तास बाकी राहिले आहेत. एन्कोर हेल्थकेअर प्रायव्हेट लिमिटेडचे ​​सीईओ वीरेन मर्चंट व उद्योजिक शैला मर्चंट यांची लेक राधिका लवकरच अंबानींची सून होणार आहे. उद्या, १२ जुलैला अनंत अंबानी व राधिका मर्चंट लग्नबंधनात अडकणार असून आयुष्याचा नवा प्रवास सुरू करणार आहेत. त्यामुळे आता पाहुण्यांची लगबग सुरू झाली आहे. हॉलीवूड, बॉलीवूड आणि दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील कलाकार अनंत-राधिकाच्या लग्नासाठी मुंबईत दाखल होताना दिसत आहेत. नुकतेच प्रियांका चोप्रा व राम चरण मुंबई विमानतळाच्या बाहेर पाहायला मिळाले.

दाक्षिणात्य सुपरस्टार राम चरण पत्नी उपासना आणि मुलीसह अनंत-राधिकाच्या लग्नासाठी मुंबईत दाखल झाला आहे. ‘कमलेश नंद’ या इन्स्टाग्राम पेजवर राम चरणचा मुंबई विमानतळावरील व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. यामध्ये अभिनेता पत्नी आणि मुलीसह मुंबई विमानतळा बाहेर पडताना दिसत आहे. यावेळी तो काळ्या रंगाच्या कपड्यांमध्ये पाहायला मिळत आहे. तर पत्नी उपासना त्याच्या मागून मुलीला घेऊन गाडीत बसताना दिसत आहे. राम व उपासनाचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.

हेही वाचा – अनंत अंबानी-राधिका मर्चंटच्या लग्नाआधी झालेली शिव शक्ती पूजा का केली जाते? जाणून घ्या…

राम चरण शिवाय हॉलीवूड व बॉलीवूड गाजवणारी अभिनेत्री प्रियांका चोप्रा खास अनंत-राधिकाच्या लग्नासाठी मुंबईत पोहोचली आहे. पती निक जोनसबरोबर ती मुंबई विमानतळावर पाहायला मिळाली. प्रियांका व निकचा व्हिडीओ सेलिब्रिटी फोटोग्राफर ‘विरल भयानी’च्या पेजवर शेअर करण्यात आला आहे.

हेही वाचा – Video: ‘जवान’ दिग्दर्शक अ‍ॅटलीचा विकी कौशलबरोबर ‘तौबा तौबा’ गाण्यावर जबरदस्त डान्स, अनंत-राधिकाच्या संगीत सोहळ्यात थिरकले

हेही वाचा – Video: “तुझा अभिमान आहे”, हेमांगी कवीचा ‘तो’ व्हिडीओ पाहून मधुराणी प्रभुलकरची प्रतिक्रिया, अभिनेत्रीनं नेमकं काय केलं? जाणून घ्या…

दरम्यान, अनंत-राधिकाचं लग्न १२ जुलैला दुपारी ३ वाजता शुभ मुहूर्तावर होणार आहे. त्यानंतर १३ जुलैला संध्याकाळी आशीर्वाद समारंभ होणार आहे. या समारंभाला मोजके पाहुणे उपस्थित राहणार आहेत. १४ जुलैला रिसेप्शन सोहळा आयोजित करण्यात आला आहे. या सोहळ्याला मीडिया आणि फिल्म इंडस्ट्रीतील लोकांना आमंत्रित करण्यात आलं आहे. या सगळ्या कार्यक्रमांना विविध ड्रेस कोड ठेवण्यात आला आहे.

Story img Loader