दाक्षिणात्य सुपरस्टार राम चरणची पत्नी उपासना कामिनेनी २० जुलैला ३४ वा वाढदिवस साजरा केला. हा दिवस राम चरण आणि उपासनासाठी खूप खास होता कारण, त्यांची लाडकी लेक सुद्धा एक महिन्याची झाली आहे. उपासनाच्या वाढदिवशी क्लिन कारा १ महिन्याची झाल्याने सुपरस्टार राम चरणने भावूक पोस्ट शेअर करत पत्नीसह लेकीला शुभेच्छा दिल्या आहेत.

हेही वाचा : “माझे मित्र आईला घाबरतात”, सोहमने सांगितला आई सुचित्रा बांदेकरचा किस्सा; म्हणाला, “कधीही न खाल्लेल्या पालेभाज्या…”

Praveen Trade
Mahakumbh 2025: “अद्भुत अनुभव…”, प्रवीण तरडेंची पत्नीसह महाकुंभमेळ्याला हजेरी; व्हिडीओ केला शेअर, नेटकरी कौतुक करीत म्हणाले…
Mulund renamed new Dharavi Dharavi redevelopment rehabilitation Mulund residents agitated boards
‘मुलुंडचे लवकरच नवीन धारावी नामांतर’, संतप्त मुलुंडवासियांकडून मुलुंडमध्ये…
Rapper Raftaar is all set to tie the knot with fashion stylist Manraj Jawanda
रफ्तार दुसऱ्यांदा लग्नबंधनात अडकणार! घटस्फोटाच्या ५ वर्षांनी रॅपर चढणार बोहल्यावर, होणारी बायको कोण आहे? वाचा…
hema malini laughed at ramdev baba
Video: गंगेत डुबकी मारणाऱ्या रामदेव बाबांनी केलं असं काही की…; हेमा मालिनींना हसू आवरेना
video of true two school friend met after 5 years
VIDEO : तब्बल पाच वर्षानंतर जिवलग मैत्रीणी भेटल्या अन् मिठी मारून ओक्साबोक्शी रडल्या; व्हिडीओ पाहून नेटकरी झाले भावुक
Naga Chaitanya
‘थांडेल’ चित्रपटाच्या ट्रेलर लाँच सोहळ्यात नागा चैतन्यला आली पत्नी सोभिताची आठवण; म्हणाला…
Mamta Kulkarni
Maha Kumbh 2025 : ममता कुलकर्णी, अनुपम खेरनंतर ‘या’ प्रसिद्ध गायकाची महाकुंभ मेळ्याला हजेरी; शेअर केला खास Video
Beating of girlfriend by boyfriend on road
“त्याने आधी तिच्या कानाखाली मारली नंतर केस ओढले…” भररस्त्यात प्रियकराकडून प्रेयसीला मारहाण; VIDEO पाहून नेटकरी म्हणाले, “त्याची मर्दांगी…”

राम चरणने पत्नी उपासनाच्या वाढदिवसानिमित्त एक खास व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये त्याचा आणि उपासनाच्या आयुष्याचा आतापर्यंतचा प्रवास दाखवण्यात आला आहे. व्हिडीओच्या सुरुवातीला मुलगी झाल्याची आनंदाची वार्ता कुटुंबीयांना कळते त्यानंतर घरातील प्रत्येक सदस्य “किती गोड बाळ आहे…” अशी प्रतिक्रिया देताना दिसत आहे.

हेही वाचा : “कधी निर्भया, कधी मुंबई, आणि आता मणिपूर…”, प्रसिद्ध गायकाने मणिपूर घटनेवर व्यक्त केला संताप

व्हिडीओमध्ये उपासना आणि राम चरण सांगतात, “सुरुवातीचे आठ महिने सोपे होते त्यानंतर गोष्टी बदलल्या, उपासनाला हलताही येत नव्हते अनेकदा ती भावूक व्हायची… आम्ही बाळाची आतुरतेने वाट पाहत होतो. ११ वर्ष वाट का पाहिली? सगळेजण विचारत होते पण, प्रत्येक गोष्टीला वेळ दिला पाहिजे.” या व्हिडीओमध्ये राम चरण आणि उपासनाच्या लग्नाची झलकही पाहायला मिळते.

हेही वाचा : “इज्जत की बची ना चिंधियाँ, वहाँ बिके पवार और सिंधिया…”; मणिपूरच्या घटनेवर स्वानंद किरकिरेंचा सणसणीत टोला

उपासना क्लिन काराच्या नामकरण सोहळ्यात भावूक झाल्याचे पाहायला मिळाले. राम चरणने हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर केला असून कॅप्शनमध्ये “वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा उप्सी ( उपासना ) आणि एक महिन्याच्या कारा खूप प्रेम तू आमचे सर्वात मोठे गिफ्ट आहेस…”, असे लिहिले आहे. दरम्यान राम चरण आणि उपासनाने २०१२ मध्ये लग्न केले होते.

Story img Loader