‘आरआरआर’ चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई केली होती, त्यानंतर चित्रपटाला भारताकडून ऑस्करसाठी पाठवण्यात आले होते. ऑस्करमध्ये चित्रपटाला तर नाही पण त्यातील ‘नाटू नाटू ‘गाण्याला पुरस्कारासाठी नामांकन मिळाले आणि १३ मार्च रोजी झालेल्या सोहळ्यात गाण्याने पुरस्कार जिंकला. या गाण्यात राम चरण व ज्युनिअर एनटीआर यांनी डान्स केला होता. पण, ऑस्कर सादरीकरणात मात्र हे दोन्ही अभिनेते दिसले नाहीत. त्यामागच्या कारणांचा खुलासा राम चरणने केला आहे.

“भारतातील मुली आळशी आहेत” म्हणणाऱ्या सोनाली कुलकर्णीवर नेटकऱ्यांचा संताप; म्हणाले, “नोकरी करणाऱ्या स्त्रिया…”

तुम्ही ‘नाटू नाटू’ गाण्यावर डान्स का केला नाही? ऑस्कर समितीने तुमच्याशी संपर्क साधला नव्हता का? असे प्रश्न एका मुलाखतीत राम चरणला विचारण्यात आले. त्यावर प्रतिक्रिया देताना अभिनेता म्हणाला “खरं सांगायचं झालं तर सर, मी वाट पाहत होतो, पण त्यांनी आमच्याशी संपर्क साधला नाही आणि का संपर्क साधला नाही हे मला माहीत नाही. पण आमच्या गाण्यावर परफॉर्मन्स झाला याचा मला आनंद आहे. लोकांना आमचं गाणं आवडलं. हे भारताचं गाणं आहे, लोकांचं गाणं आहे.”

सलमानच्या गर्लफ्रेंडशी लग्न, घटस्फोटानंतर तब्बूच्या बहिणीशी विवाह; एकेकाळी चॉकलेट हिरो राहिलेला ‘हा’ अभिनेता आता काय करतो?

राम चरणने ऑस्करमध्ये गाणं जाण्याबद्दलही भाष्य केलं. ऑस्करपर्यंत पोहोचणे ही मोठी गोष्ट आहे. सत्यजित रेपासून राजामौलीपर्यंत आपण सिनेमा पुढे जाताना पाहिला आहे. आपला देश तिथे पोहोचला याचा मला खूप आनंद आहे. ‘नाटू नाटू’ला ऑस्कर मिळाल्यावर आपली प्रतिक्रिया काय होती, याबद्दलही राम चरणने सांगितलं. “गाण्याचं नाव ऐकून मी सुन्न झालो होतो. माझी पत्नी माईक टायसनसारखा माझा हात धरून होती. ऑस्करने चांगल्या सिनेमाचं कौतुक केलं आहे. पुरस्कारामुळे आम्ही आनंदी आहोत,” असंही राम चरण म्हणाला.

Story img Loader