दाक्षिणात्य सुपरस्टार राम चरण व त्याची पत्नी उपासना यांच्या घरी गेल्यावर्षी जून महिन्यात एका नव्या पाहुणीचं आगमन झालं. लग्नाच्या ११ वर्षानंतर अभिनेता राम चरण बाबा झाला. त्याची पत्नी उपासनाने २० जून २०२३ रोजी एका गोंडस मुलीला जन्म दिला. पतीप्रमाणे उपासना देखील दक्षिणेत प्रचंड लोकप्रिय आहे. मनोरंजविश्वापासून दूर असली तरीही कॉर्पोरेट क्षेत्रात उपासनाचं मोठं नाव आहे.

उपासना कामिनेनी ही एक बिझनेस वुमन आहे. अपोलो हॉस्पिटल्सच्या कार्यकारी उपाध्यक्ष शोबना कामिनेनी यांची ती मुलगी आहे. नुकतीच जागतिक महिला दिनानिमित्त उपासनाने हिंदुस्थान टाइम्सला मुलाखत दिली. यावेळी बाळंतपण, संसार आणि मूल झाल्यावर महिलांचं करिअर अशा बऱ्याच विषयांवर तिने भाष्य केलं. तसेच यावेळी करिअर करणाऱ्या महिलांनी त्यांचे एग्ज फ्रीज केले (eggs freeze) पाहिजेत असं मत उपासनाने मांडलं.

बाळंतपण झाल्यावर अनेक स्त्रिया नोकरी सोडण्याचा निर्णय घेतात. याबद्दल मत मांडताना उपासना म्हणाली, “आई झाल्यावर नोकरी करणं खरंच खूप कठीण असतं. यातून कसा मार्ग काढावा यासाठी माझी नेहमीच धडपड सुरू असते. परंतु, आई झाल्यावर महिलेचं आयुष्य आधीसारखं राहत नाही हे अगदी खरं आहे. अनेक महिलांना मनासारखं काम देखील करता येत नाही.”

हेही वाचा : अंबानींच्या प्री-वेडिंगमध्ये शाहरुखचा हटके अंदाज, किंग खानचं गुजराती ऐकून सगळेच झाले थक्क! म्हणाला, ‘तबीयत एकदम…’

कामाच्या ठिकाणी महिलांना चांगल्या सुविधा मिळाव्यात यासाठी गेली अनेक वर्षे उपासना काम करत आहे. अनेक महिलांना करिअरची निवड करावी की, बाळंतपण स्वीकारावे? याबद्दल मनात साशंकता असते याबाबत उपासना म्हणाली, “जर एखादी महिला बाळाला जन्म देण्याआधी प्राधान्याने स्वत:च्या करिअरचा विचार करत असेल, तर भविष्यात त्या संबंधित महिलेला कोणावर अवलंबून राहण्याची गरज भासणार नाही. त्यामुळे प्रत्येकाने सविस्तर योग्य विचार करून बाळंतपणासंदर्भातील निर्णय घेतला पाहिजे.”

हेही वाचा : अंबानींचं प्री-वेडिंग संपता संपेना…; शाहरुख, सलमानसह रणवीर सिंह पुन्हा पोहोचले जामनगरला, व्हिडीओ व्हायरल

उपासना पुढे म्हणाली, “जेव्हा तुम्ही मनापासून पालकत्व स्वीकारण्यासाठी तयार असता, आर्थिकदृष्ट्या सक्षम असता अशावेळी जोडप्यांनी आई-बाबा होण्याचा निर्णय घेणं योग्य ठरतं असं मला वाटतं. जेणेकरून बाळंतपण झाल्यावर महिलेची योग्य दिशेने प्रगती होऊ शकते. प्रत्येक महिलेची प्रगती झाल्यास देशाचीही निश्तिपणे प्रगती होईल. बाळासाठी मी देखील माझे एग्ज फ्रीज (eggs freeze)केले होते. आम्ही आमच्या नात्याच्या सुरुवातीलाच हा निर्णय घेतला होता. मुलाचं संगोपन करण्यासाठी आपण आर्थिकदृष्ट्या स्थिर व सुरक्षित असलं पाहिजे हा यामागचा हेतू होतो. मी आणि रामने मिळून घेतलेल्या आमच्या या निर्णयाचा मला काय अभिमान व आदर वाटतो.”

हेही वाचा : तारीख अन् वेळ ठरली! ‘झी मराठी’वर सुरू होणार दोन नव्या मालिका, प्रोमो आले समोर…

“भारतातील कॉर्पोरेट क्षेत्रात महिलांसाठी आणखी काही बदल होणं आवश्यक आहेत. कामाच्या ठिकाणी महिलांचं आयुष्य सुखकर करण्यासाठी ‘पोश’ (POSH ) समित्यांनी त्यांना मदत केली पाहिजे. कंपन्यांकडून स्त्रियांना प्रसूती काळात व्यवस्थित रजा मिळावी आणि करिअर करणाऱ्या महिलांनी त्यांचे एग्ज फ्रीज (eggs freeze ) करावेत यासाठी मी सध्या काम करत आहे” असं उपासना कामिनेनी सांगितलं.

Story img Loader