काही वर्षांपूर्वी दूरदर्शनवरून प्रसारित झालेल्या आणि लोकप्रियतेचे नवे उच्चांक गाठलेल्या रामायण या मालिकेतील ‘राम’ अर्थात अभिनेता अरुण गोविल दीर्घ कालावधीनंतर पुन्हा एकदा दूरदर्शनच्या छोटय़ा पडद्यावर पदार्पण करण्यास सज्ज झाला आहे.‘धरती की गोद में’ या मालिकेद्वारे अरुण गोविल दीर्घ कालावधीनंतर पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. येत्या ऑगस्ट महिन्याच्या शेवटच्या आठवडय़ात प्रसारित होणाऱ्या भागांपासून गोविल या मालिकेत पाहायला मिळणार आहेत.मालिकेशी संबंधित मंडळींनी मालिकेत छोटी भूमिका करावी, अशी विनंती गोविल यांना केली होती. ती भूमिका त्यांना पसंत पडल्याने गोविल यांनी मालिकेत काम करण्यास सहमती दर्शविली.

Story img Loader