चित्रपट दिग्दर्शक राम गोपाल वर्मा हे त्यांच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे नेहमी चर्चेचा विषय असतात. अनेकदा नेटकऱ्यांनी त्यांना सोशल मीडियावर ट्रोल देखील केले आहे. तसेच त्यांचे चित्रपटही चर्चांमध्ये असल्याचे पहायला मिळाले होते. आता राम गोपाल वर्मा हे एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आहेत. अनेक सुपरहिट चित्रपटांचे दिग्दर्शन केल्यानंतर ते स्वत: चित्रपटात काम करणार असल्याचे समोर आले आहे. राम गोपाल वर्मा हे अभिनयाच्या दुनियेत पदार्पण करणार आहेत. त्यांनी या चित्रपटाच्या चित्रीकरणास सुरूवात देखील केली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सूत्रांनुसार राम गोपाल वर्मा हे ‘कोबरा’ चित्रपटात झळकणार असल्याचे समोर आले आहे. हा चित्रपट तेलुगू भाषेमधील आहे. या चित्रपटात ते एका सीबीआय अधिकाऱ्याची भूमिका निभावणार आहेत. खुद्द राम गोपाल वर्मा यांनी ट्विटरद्वारे या बाबत माहिती दिली आहे. ‘मी माझ्या वाढदिवसाशी अभिनयाच्या दुनियेत पाऊल ठेवत आहे. तुम्हा सर्वांचे आशिर्वाद मला लाभले तर मला आनंद होईल. धन्यवाद’ असे त्यांनी ट्विट केले होते.

राम गोपाल वर्मा यांच्या ‘सरकार’ चित्रपटात मुख्य भूमिका साकारणारे, बॉलिवूडचे सुपरस्टार अमिताभ बच्चन यांनी राम गोपाल वर्मा यांना त्यांच्या पुढील वाटचालीसाठी ट्विटरद्वारे शुभेच्छा दिल्या आहेत. ‘अखेर राम गोपाल वर्मा अभिनयाच्या दुनियेत उतरणार. आता आणखी एक स्पर्धक असणार’ असे बिग बींनी ट्विट केले होते.

१९८९ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘शिवा’ चित्रपटापासून राम गोपाल वर्मा यांनी चित्रपटाच्या करिअरला सुरूवात केली होती. त्यानंतर त्यांच्या ‘सत्या’, ‘कंपनी’, ‘सरकार’ चित्रपटांची प्रशंसा झाली होती.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ram gopal varma debuts as actor in tamil film