दिग्दर्शक राम गोपाल वर्मा त्यांच्या स्पष्टवक्तेपणासाठी ओळखले जातात. अनेकदा त्यांनी केलेल्या विधानामुळे ते अडचणीत येतात. आता त्यांनी ‘पुष्पा २’ आणि अल्लू अर्जुनवर विधान केले आहे. पण यावेळी कुठलेही वादग्रस्त विधान न करता अल्लू अर्जुनचे ‘पुष्पा २’ सिनेमातील अभिनयासाठी कौतुक केले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

राम गोपाल वर्मा यांनी त्यांच्या पोस्टमध्ये अल्लू अर्जुनच्या अभिनयाची तसेच पुष्पाच्या व्यक्तिरेखेची प्रशंसा केली. त्यांनी लिहिले, “भारतीय चित्रपटांमध्ये भूमिकेच्या बारकाव्यांवर काम करून घडवलेल्या व्यक्तिरेखा दुर्मिळ असतात, आणि एखादा स्टार स्वतःची प्रतिमा विसरून त्या व्यक्तिरेखेत पूर्णपणे सामावतो हे तर अधिक दुर्मिळ आहे.” राम गोपाल वर्मा पुढे म्हणाले की, “अल्लू अर्जुनने पुष्पाची भूमिका इतक्या सहजतेने साकारली की ती व्यक्तिरेखा खरोखर अस्तित्वात असल्याचे वाटू लागले आहे. “पुष्पा चित्रपट व्यावसायिक (कमर्शियल सिनेमा) आणि मुख्य प्रवाहात (मेन स्ट्रीम) राहूनही इतका वास्तववादी वाटतो हे फार दुर्मिळ यश आहे,” असेही त्याने नमूद केले. 

हेही वाचा…Pushpa 2 : ‘पुष्पा 2’ मधल्या ‘या’ आडनावावरुन करणी सेना आक्रमक, निर्मात्यांना थेट घरात घुसून मारण्याचा इशारा

राम गोपाल वर्मा यांनी पुष्पाच्या व्यक्तिरेखेतील बारकावे उलगडताना सांगितले की, ती व्यक्तिरेखा निरागसता आणि चतुराईचा संगम आहे. तसेच, “अभिमान आणि असुरक्षिततेच्या (भावनेच्या) मिश्रणाने ती व्यक्तिरेखा अजून बहुआयामी बनली आहे.” पुष्पाच्या खांद्याचा झुकलेला भाग, प्रत्यक्षात एक शारीरिक व्यंग आहे, याचा उल्लेख करताना त्यांनी म्हटले, “एखादा शारीरिक व्यंग असलेला माणूस सुपर अ‍ॅक्शन हिरो वाटू शकतो हा विचार मी कधीही केला नव्हता. पण पुष्पाच्या व्यक्तिमत्त्वात, अल्लू अर्जुनने त्या शारीरिक व्यंगाची एक वेगळी ओळख तयार करत त्याच्या जबरदस्त सादरीकरणाने
त्याच्या देहबोली, आणि हावभावातून प्रेक्षकांच्या मनावर कायमची छाप सोडली.अल्लू अर्जुनने विविध भावना पडद्यावर उत्तमरित्या मांडल्या आहेत” असे राम गोपाल वर्मा म्हणाले.

हेही वाचा…ऐश्वर्या राय-अभिषेक बच्चन दुसऱ्यांदा आई-बाबा होणार? रितेश देशमुखच्या ‘त्या’ प्रश्नावर अभिनेता म्हणाला…

दरम्यान, ‘पुष्पा २: द रुल’ चित्रपट बॉक्स ऑफिसवर नवनवीन विक्रम करीत आहे. जगभरात चित्रपटाने आतापर्यंत ६०० कोटींचा गल्ला जमवला असून सर्वांत वेगवान ५०० कोटींचा टप्पा पार करणारा हा भारतीय चित्रपट ठरला आहे. 

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ram gopal varma review pushpa 2 applauds allu arjun powerful transformation psg