बॉलिवूड दिग्दर्शक राम गोपाल वर्मा चित्रपटांसोबतच आपल्या वादग्रस्त विधानांसाठी विशेष ओळखले जातात. ते सतत कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असतात. ते सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसते. काही दिवसांपूर्वी राम गोपाल वर्मा यांच्या एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. त्या व्हिडीओत ते अभिनेत्री इनाया सुलतान दिसत आहे.

मात्र, हा व्हिडीओ त्यांचा नसल्याचे त्यांनी एक पोस्ट शेअर करत सांगितले आहे. राम गोपाल वर्मा यांनी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवरून हा व्हिडीओ शेअर केला आहे. ‘मला पुन्हा एकदा स्पष्ट करायचे आहे की या व्हिडीओमध्ये जो माणूस आहे तो मी नाही आणि लाल रंगाच्या ड्रेसमध्ये जी मुलगी आहे ती इनाया सुलतान नाही आणि मी अमेरिकचे राष्ट्रपती जो बायडन यांची शपथ घेतो,’ अशा आशयाचे कॅप्शन तो व्हिडीओ शेअर करत राम गोपाल वर्मा यांनी दिले आहे.

आणखी वाचा : सलमानला विमानतळावर थांबवणाऱ्या CISF जवानावर कारवाई; मोबाइल जप्त

 

ram gopal varma twitter, ram gopal varma troll
राम गोपाल वर्मा यांनी सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर केल्यानंतर त्यांना ट्रोल करण्यात आले आहे.

आणखी वाचा : ५६ वर्षांच्या प्रकाश राज यांनी पुन्हा एकदा केले लग्न, फोटो व्हायरल

त्यांचे हे ट्वीट पाहिल्यानंतर नेटकऱ्यांनी राम गोपाल वर्मा यांनी ट्रोल केले आहे. एक नेटकरी म्हणाला, ‘वयाच्या ६० व्या वर्षी इतका उत्साह, तुम्हाला लाज वाटली पाहिजे सर, तुम्ही तुमच्या नातवंडाच्या वयाच्या मुलीसोबत सगळ्यासमोर डान्स करत आहात.’ दुसरा नेटकरी म्हणाला,’ मला माझ्या डोळ्यांवर विश्वास होत नाही आहे…हे कस वाटतं आहे आणि ती महिला त्याला दूर करण्याचा प्रयत्न का करत नाही!’ तिसरा नेटकरी म्हणाला, ‘तिच्यासारख्या मुलींमुळेच बहुतेक निर्माते इतर नवोदितांना अशी वागणूक देतात. फक्त एका छोट्या भूमिकेसाठी तिने हे सगळं करण्याची परवानगी दिली आहे मग एका चित्रपटामध्ये एका महिलेच्या मुख्य भूमिकेसाठी किती अटी असतील याचा विचार करा,’

Story img Loader