दिग्दर्शक विवेक अग्नीहोत्री यांच्या ‘द काश्मीर फाइल्स’ या चित्रपटाने पुन्हा एकदा काश्मिरी पंडितांचा मुद्दा चर्चेत आणला आहे. या चित्रपटात १९९०च्या दशकातील काश्मिरी पंडितांच्या हत्याकांडाचे चित्रण करण्यात आले आहे. हा चित्रपट पाहिल्यानंतर सर्वांचे डोळे पाणावल्याचे पाहायला मिळते. या चित्रपटाचे देशभरातून कौतुक होत आहे. तर दुसरीकडे निर्माते राम गोपाल वर्मा यांनी त्यांचा रिव्ह्यू दिला आहेत. तर यावर विवेक अग्निहोत्री यांनी त्यांची प्रतिक्रिया दिली आहे.
राम गोपाल वर्मा यांनी त्यांच्या यूट्यूब चॅनलवर ‘आय हेट काश्मीर फाइल्स’ नावाचा व्हिडिओ शेअर केला आहे. व्हिडिओच्या सुरुवातीला राम गोपाल वर्मा म्हणाले, “माझ्या संपूर्ण कारकिर्दीत पहिल्यांदाच एखाद्या चित्रपटाचा रिव्ह्यू देत आहे. मी चित्रपटाच्या विषयावर किंवा वादग्रस्त असलेल्या कंटेटचा रिव्हू देत नाही, एक चित्रपट निर्माता म्हणून हा चित्रपट कसा बनवला याचा रिव्ह्यू द्यायचा आहे.” यानंतर राम गोपाल वर्मा यांनी व्हिडिओमध्ये या चित्रपटाचे कौतुक केले. त्यांनी चित्रपटाच्या निर्मितीचे आणि त्यातील भूमिका आणि कथेचे कौतुक केले. तर त्यांना अनुपम खेर यांचा अभिनय आवडल्याचे ते म्हणाले आहेत.
आणखी वाचा : सर्वांसमोर नवऱ्यावर भडकली अंकिता लोखंडे; पाहा होळी पार्टीत असं काय घडलं…
आणखी वाचा : या ३ अक्षराच्या मुली असतात भाग्यवान, लग्नानंतर ज्या घरात जातील तिथे होईल धनवर्षाव
हा व्हिडीओ ट्विटवर शेअर करत राम गोपाल वर्मा, म्हणाले “बॉलीवूड, टॉलीवूड द काश्मीर फाइल्सच्या यशाकडे दुर्लक्ष करत आहेत. हे खरं आहे की हा चित्रपट प्रेक्षकांनी जितका गांभीर्याने घेतला त्यातून जास्त गांभीर्याने ते घेत आहेत. पण ते शांत राहण्याचे कारण ते घाबरले आहेत.” तर राम गोपाल वर्माच्या ट्वीटला रिट्वीट करत विवेक अग्निहोत्री म्हणाले, “तू द काश्मीर फाइल्ससा हेट करतोस म्हणून माझं तुझ्यावर प्रेम आहे.”
दरम्यान, हा चित्रपट ११ मार्च रोजी प्रदर्शित झाला आहे. हा चित्रपट काश्मिरी पंडितांच्या स्थलांतरित जीवनावर आधारित आहे. काश्मीर फाईल्स हा चित्रपट १९८९ आणि १९९० मध्ये काश्मिरी पंडितांच्या झालेल्या स्थलांतरावर आधारित आहे. तर अनेक राज्यांमध्ये हा चित्रपट अनेक करमुक्त करण्यात आला आहे.