सिनेरसिक ख्रिस्तोफर नोलनच्या चित्रपटांची फारच आतुरतेने वाट पहात असतात. त्याच्या चित्रपटाची क्रेझ आपल्या भारतातही प्रचंड बघायला मिळते. नुकताचा त्याचा ‘ओपनहायमर’ हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. भारतात गेले काही दिवस या चित्रपटाची प्रचंड चर्चा होती. अणूबॉम्बचे जे. रॉबर्ट ओपनहायमर यांच्या जीवनावर हा चित्रपट बेतलेला आहे.
भारतात या चित्रपटाला उत्तम प्रतिसाद मिळत असून सामान्य प्रेक्षक, नोलनचे चाहते तसेच चित्रपट समीक्षक यांनी या चित्रपटाचं भरभरून कौतुक केलं आहे. बॉलिवूडमधील मंडळीसुद्धा नोलनच्या या चित्रपटाचं कौतुक करताना दिसत आहेत. प्रसिद्ध दिग्दर्शक राम गोपाल वर्मा यांनीसुद्धा ट्वीटच्या माध्यमातून ‘ओपनहायमर’चं कौतुक केलं.
चित्रपटात सेक्स सीनदरम्यान भगवद्गीता वाचण्याच्या एका सीनवरुन सध्या चांगलाच वादंग निर्माण झाला आहे. याबद्दलसुद्धा राम गोपाल वर्मा यांइ ट्वीट करत भारतीयांचे कान खेचले आहे. आपल्या ट्वीटमध्ये राम गोपाल वर्मा लिहितात, “गंमतीची बाब अशी आहे की अमेरिकन अणुशास्त्रज्ञ ओपेनहाइमर यांनी भगवद्गीता वाचली, पण मला शंका आहे तीच भगवद्गीता ०.००००००१% भारतीयांनी तरी वाचली आहे की नाही?”
राम गोपाल वर्मा यांच्या या वक्तव्याचं बऱ्याच लोकांनी समर्थन केलं आहे. काही लोकांनी आकडे मांडून राम गोपाल वर्मा हे वस्तुस्थिती सांगत आहेत असंही म्हंटलं आहे. आहे.ओपनहायमर यांनी हिंदू धर्मातील वेद आणि भगवद्गीतेचा प्रचंड अभ्यास केला होता, चित्रपटातही या गोष्टीचा उल्लेख आला आहे. ओपनहायमर यांची भूमिका अभिनेता सिलियन मर्फीने केली आहे. त्याच्याबरोबरच रॉबर्ट डाउनी ज्युनिअर, मॅट डॅमन, एमिली ब्लंट, रामी मलिक यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत.