बॉलिवूडचा भाईजान सलमान खानला त्याच्या वाढदिवसाच्या आदल्यादिवशी त्याला सर्पदंश झाल्याची घटना समोर आली होती. यानंतर रात्री उशिरा सलमान खानला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचारानंतर सलमान खानला रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. या संपूर्ण प्रकरणावर आता फिल्ममेकर राम गोपाल यांनी एक एक पोस्ट शेअर करत त्यांची प्रतिक्रिया दिली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

राम गोपाल वर्मा यांनी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवरून ही पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी एक साप आरोपीच्या पिंजऱ्यात असून तो बोलतो की ज्या सापाने सलमानला सर्पदंश केला, तो मी नाही तर माझा ड्रायव्हर होता. राम गोपाल वर्मा यांची ही पोस्ट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाली आहे.

आणखी वाचा : तैमूरच्या फोटोवर कंगनाची कमेंट पाहून नेटकऱ्यांना बसला धक्का, म्हणाले…

राम गोपाल वर्मा यांनी शेअर केलेल्या या फोटोवरून नेटकऱ्यांनी हिट-अँड-रन प्रकरणाची आठवण करून देणार आहे. ज्यामध्ये सलमानच्या गाडीचा अपघात झाला होता. २७ सप्टेंबर २००२ रोजी रात्री घडलेल्या या घटनेत एकाचा मृत्यू झाला आणि काही जण जखमी झाले. सलमानवर दारूच्या नशेत गाडी चालवल्याचा आरोप होता आणि त्याला ट्रायल कोर्टाने मे २०१५ मध्ये पाच वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली होती. नंतर डिसेंबर २०१५ मध्ये सलमानने मुंबई उच्च न्यायालयात स्पष्टीकरण दिले होते की त्याचा ड्रायव्हर अशोक सिंग गाडी चालवत होता. हायकोर्टाने त्यांची निर्दोष मुक्तता केली आणि ट्रायल कोर्टाचा आदेश रद्द केला.

आणखी वाचा : “अशिक्षित आणि…”, सुधीर मुनगंटीवारांबाबत सोनम कपूरची पोस्ट व्हायरल!

दरम्यान, सलमान ‘अंतिम: द फाइनल ट्रुथ’ या चित्रपटात दिसला होता. तर, लवकरच सलमान कतरिना कैफसोबत ‘टायगर ३’ मध्ये दिसणार आहे. त्यानंतर सलमान ‘किक २’ या चित्रपटाचे चित्रीकरण करणार आहे. सध्या सलमान ‘बिग बॉस १५’ या रिअॅलिटी शोचे सुत्रसंचालन करत आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ram gopal varma takes dig at salman khan over snake bite incident dcp