विजय देवरकोंडा व अनन्या पांडेचा ‘लायगर’ चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगलाच आपटला. आपल्या चित्रपटाला उत्तम प्रतिसाद मिळणार याबाबत विजयला खात्री होती. मात्र प्रत्यक्षात तसं काहीच घडलं नाही. अनन्याच्या अभिनयाची देखील नेटकऱ्यांनी खिल्ली उडवली. तसेच बॉयकॉट ट्रेंडमुळे देखील हा चित्रपट चर्चेत आला. चित्रपटाला मिळालेल्या अपयशाबाबत आता प्रसिद्ध दिग्दर्शक राम गोपाल वर्मा यांनी अजब वक्तव्य केलं आहे.

आणखी वाचा – “माझी फसवणूक केली अन्…” बॉलिवूड निर्मात्याचे सनी देओलवर गंभीर आरोप, नेमकं प्रकरण काय?

Kartik Aaryan Recalls His Struggle
वारंवार नकार तरी मानली नाही हार; कार्तिक आर्यनने शेअर केल्या संघर्ष काळातील आठवणी, म्हणाला, “मला लाज…”
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
Sharad Pawar and Vinod Tawade over Amit Shah Critisicm
Vinod Tawade : “पवारांनी दाऊदच्या हस्तकांना हेलिकॉप्टरमधून प्रवास घडवला”; विनोद तावडेंचा गंभीर आरोप!
Hrishikesh Shelar
‘तुला शिकवीन चांगलाच धडा’फेम अभिनेत्याने प्रियदर्शन जाधव, विशाखा सुभेदार यांच्याबरोबर काम करण्याचा सांगितला अनुभव, म्हणाला…
When Jaya Bachchan said she felt like slapping Shah Rukh Khan (1)
“मी त्याला झापड मारली असती”, सून ऐश्वर्या रायमुळे शाहरुख खानवर भडकलेल्या जया बच्चन
hasan mushrif ajit pawar (1)
“…तर अजित पवार धनंजय मुंडेंना सोडणार नाहीत”, हसन मुश्रीफांचं वक्तव्य
Gulabrao Patil insta
जळगावचं पालकमंत्रिपद पुन्हा गुलाबराव पाटलांकडेच? घोषणेआधीच मोठं वक्तव्य; विरोधकांना दमबाजी करत म्हणाले…
Ajit Pawar dhananjay munde walmik karad
“बळं बळं चौकशी…”, धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याच्या प्रश्नावर अजित पवारांचा संताप; म्हणाले, “या प्रकरणात…”

काय म्हणाले राम गोपाल वर्मा?

पिंकविलाच्या वृत्तानुसार, ‘लायगर’ चित्रपट सुपरफ्लॉप का ठरला? यामागचं कारण राम गोपाल वर्मा यांनी सांगितलं आहे. ते म्हणाले, “विजय देवरकोंडाने ‘लायगर’ चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान काही वादग्रस्त वक्तव्य केली. चित्रपटावर याचा नकारात्मक परिणाम झाला. राम चरण, अल्लू अर्जून, ज्युनिअर एनटीआर, प्रभास यांच्या तुलनेमध्ये विजय हिंदी प्रेक्षकांचं मन जिंकू शकला नाही. विजय देवरकोंडाच्या उद्धटपणामुळे प्रेक्षकांनी या चित्रपटाकडे पाठ फिरवली.”

“त्याचबरोबरीने अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या निधनानंतर करण जोहरच्या चित्रपटांना सोशल मीडियावर नकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. इतर दाक्षिणात्य कलाकारांप्रमाणेच विजयमध्ये नम्रता नसल्याचं दिसून आलं. म्हणूनच ‘लायगर’ला अपयश सहन करावं लागलं.” राम गोपाल यांचं हे वक्तव्य सध्या चांगलंच चर्चेत आलं आहे.

आणखी वाचा – “कन्नड चित्रपटसृष्टी संपुष्टात येणार होती पण…” महेश मांजरेकर यांचं मोठं वक्तव्य

विजय-अनन्या ‘लायगर’च्या प्रमोशनसाठी देशभरात फिरले. या चित्रपटाबाबत बरीच चर्चा रंगली. चित्रपटाच्या प्रमोशनसाठी केलेला खर्च तसेच चित्रपटाची भव्यदिव्यता लक्षात घेता हा चित्रपट सुपरहिट ठरेल असा अंदाज वर्तवला जात होता. मात्र चित्रपटाची कथाच प्रेक्षकांच्या पसंती न पडल्याने चित्रपट सुपरफ्लॉप ठरल्याचं चित्र पाहायला मिळालं.

Story img Loader