बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंग मागच्या काही दिवसांपासून त्याच्या न्यूड फोटोशूटमुळे सोशल मीडियावर जोरदार चर्चेत आहे. रणवीरनं ‘पेपर’ या इंग्रजी मासिकासाठी न्यूड फोटोशूट केलं होतं. या फोटोशूटचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केल्यानंतर रणवीरवर जोरदार टीका झाली होती. त्याच्या या फोटोशूटनंतर सोशल मीडियावर बरेच मीम्स देखील शेअर करण्यात आले. तर दुसरीकडे बॉलिवूड सेलिब्रेटींनी मात्र त्याच्या या फोटोशूटचं कौतुक केलं होतं. रणवीरच्या या फोटोशूटवर आलिया भट्ट, अर्जुन कपूर, स्वरा भास्कर, मीमी चक्रवर्ती यांच्यानंतर आता दिग्दर्शक राम गोपाल वर्माने कमेंट केली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

दिग्दर्शक राम गोपाल वर्मा त्याचा आगामी मार्शल आर्टवर आधारित चित्रपट ‘लडकी’मुळे चर्चेत आहे. रणवीरच्या फोटोशूटवर कमेंट करताना राम गोपाल वर्मानं लिंग समानतेचं उत्तम उदाहरण असल्याचं म्हटलं आहे. ‘ई-टाइम्स’शी बोलताना राम गोपाल वर्मा म्हणाला, “विचार करा. त्याचं हे फोटोशूट म्हणजे लैंगिक समानतेची मागणी आहे. जर महिलांनी शरीर दाखवलं तर आपल्याला आक्षेप नसतो मग पुरुषांनी असं केल्यानंतर त्यावर आक्षेप का घेतला जातो? याबाबतीत पुरुषांना वेगळे नियम लागू करणं हे ढोंग आहे. पुरुषांकडेही महिलांच्या बरोबरीने अधिकार असायला हवेत.”

आणखी वाचा- रणवीर सिंगला न्यूड फोटोशूट करणं पडलं महागात, मुंबईतील पोलीस ठाण्यात तक्रार दाखल

‘क्लायमॅक्स’ आणि ‘नेकड’ सारखे अडल्ट चित्रपट तयार करणारा राम गोपाल वर्मा पुढे सांगतो, “मला वाटतं आपला देश आता अखेर त्या ठिकाणी पोहोचला आहे. रणवीरनं या फोटोशूटच्या माध्यमातून लैंगिक समानतेवर आपली बाजू मांडली आहे असं माझं मत आहे.” दरम्यान रणवीर सिंगच्या या फोटोशूटवर राम गोपाल वर्माच्या अगोदर आलिया भट्ट आणि अर्जुन कपूर यांसारख्या कलाकारांनी देखील प्रतिक्रिया दिली होती.

आणखी वाचा- भारती सिंहच्या मुलाचं बेबीशूट पाहून नेटकरी संतापले, पाहा नेमकं काय घडलं

रणवीर सिंगच्या या फोटोशूटवर कमेंट करताना अर्जुन कपूरनं रणवीरला पाठिंबा दिला होता. या फोटोशूटबद्दल बोलताना, “जर रणवीर हे सर्व करून आनंदी असेल तर याचा आपणही सन्मान करायला हवा.” असं तो म्हणाला होता. याशिवाय अभिनेत्री आलिया भट्टने देखील रणवीरच्या या फोटोशूटवर प्रतिक्रिया दिली होती. आलिया म्हणाली, “मी माझा आवडत्या सहकलाकार रणवीर सिंगबद्दल कोणतीही नकारात्मक चर्चा सहन करु शकत नाही. त्यामुळे मी हा प्रश्नदेखील सहन करु शकत नाही.”

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ram gopal verma comment on ranveer singh nude photoshoot mrj